Aditya Thackrey sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thackrey News: 'नाशिकमध्ये निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशीच लढाई', आदित्य ठाकरेंनी ठणकावले

Sampat Devgire

Nashik Constituency 2024 : नाशिक मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे उमेदवार आहेत. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासोबत वाजे यांची लढत होत आहे. वाजे यांच्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.17) जाहीर सभा घेतली. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे गटाचा प्रचार स्थानिक मुद्दे आणि गद्दारी याकडे नेला. त्यामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या उमेदवारांच्या प्रचारात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

'शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे Hemant Godse यांना शिवसेनेने दोन वेळा खासदार केले. मात्र तरीही त्यांनी गद्दारी केली. ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नव्हे तर नाशिकच्या मतदारांशी देखील आहे. गेल्या दहा वर्षात गोडसे यांनी फक्त खोटारडेपणा केला आहे. शिवसेनेने Shivsena टाकलेल्या विश्वासाची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. मात्र त्यांनी तसे केले नाही. मतदानातून मतदार आणि शिवसेना कार्यकर्ते गोडसे यांच्या गद्दारीची पुरेपूर परतफेड करतील.', असे आदित्य ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळत गेल्या दहा वर्षात नाशिककरांच्या पदरात काय पडले. आपल्याला काय मिळाले. याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही मात्र सेवा करण्यासाठी आलो आहोत. असे सांगून राजाभाऊ वाजे यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय जनता पक्षाला राज्यघटना बदलायची आहे. त्यासाठीच त्यांना 400 जागा हव्या आहेत. मात्र मी लिहून देतो की, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. भारतीय जनता पक्षाला दोनशे पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. देशाची लूट भाजप सरकारने केली आहे. मोदी स्वतःला गरीब म्हणतात. मात्र त्यांच्याकडे तीन कोटी रुपयांची संपत्ती आहे. एव्हढी संपत्ती असणारा गरीब कुठे सापडेल का? असा प्रश्न देखील आदित्य ठाकरेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT