Sanjay Raut News : 'राज ठाकरे संघाच्या शाखेला भेट देणार की भाजपच्या?', संजय राऊतांनी उडवली खिल्ली

Raj Thackeray :राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा दिला मात्र मुळात त्यांची ताकतच किती, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut, Raj Thackeray
Sanjay Raut, Raj ThackeraySarkarnama

Lok Sabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी-राज ठाकरे यांची शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सत्तेत येणार नाहीत त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायचे, असा टोला लगावला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी देखील राज यांनी मोदींकडे केली. मात्र, या सभेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंची टीका केली आहे.

राज ठाकरेंनी Raj Thackeray महायुतीला पाठींबा दिला मात्र मुळात त्यांची ताकदच किती, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. राज ठाकरे संघाच्या शाखेला भेट देणार की भाजपच्या शाखेला, कारण त्यांची शाखाच नाही, असे म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. राज ठाकरे हे मोदींच्या चरणी लीन झालाचा टोला देखील राऊत Sanjay Raut यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut, Raj Thackeray
Uddhav Thackeray News : "...तर नरेंद्र मोदींचा उदयच झाला नसता"; उद्धव ठाकरेंनी काढली प्रमोद महाजनांची आठवण

'भाजप, मिंदे गट, अजित पवारांचा गटाचे पैसे वाटणे आणि धमक्या देणे हेच मुख्य हत्यार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मधून 19 पैशांच्या बॅग कशा उतरला ते मी दाखवल्या त्यानंतर त्यांनी दोन दिवसानंतर नाटक करून त्यांचे कपडे दाखवले. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी रुपये यांनी पोचवले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

बाळासाहेब मोदींना शाप देतील

'काल बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेल. हा बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती नतमस्तक होण्याचं ढोंग करत आहेत. बाळासाहेबांनी काल मोदींना शाप दिला असेल.',असे संजय राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com