Aakash Chhajed Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aakash Chhajed : काँग्रेसचे भाजपला आव्हान, आधी मणिपूर, 'नीट' घोटाळा यावर बोला

Congress's Challenge to BJP: भाजप अद्यापही लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्यात. भाजपने पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत काहीही न करता आणीबाणीचा विषय काढून जनतेच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला.

Sampat Devgire

Congress Vs BJP News : भाजपच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. डॉ पवार आणि भाजप यांनी नैतिकता शिकवू नये. आधी मणिपूर सारख्या संवेदनशील विषयावर बोलावे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार यांनी काँग्रेसवर आणीबाणी लादल्याची टीका केली होती. काँग्रेस पक्षाने यापूर्वी 90 वेळा राज्यघटनेतील तरतुदी बदलल्या. त्यामुळे आता ते राज्यघटना घेऊन संसदेत जात आहेत. जनता याला भुलणार नाही अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष छाजेड यांनी या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपने आधी मणिपूरमधील, अशांतता, कांदा निर्यात, बेरोजगारी, नीट परीक्षा घोटाळा या विषयांवर खुलासा करावा. नंतर नैतिकतेची भाषा करावी. भाजपने पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत काहीही न करता आणीबाणीचा विषय काढून जनतेच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला.

अशा पत्रकार परिषदा घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाचे नैराश्य भाजप नेत्यांमध्ये दिसून येते. सध्या देशात व महाराष्ट्रात जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याबाबत न बोलता आणीबाणी सारखे जुने विषय काढून जनतेच्या मनामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत.

काँग्रेस पक्षावर टीका करण्याआधी भाजप नेत्यांनी मणिपूरसारखी निंदनीय घटना भाजपच्या सत्ता काळात घडली. गेल्या कित्येक वर्षापासून जे शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शेतकऱ्यांचा हमीभाव, कांदा निर्यात बंदी, बेरोजगारी आणि विशेषतः सध्या ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, त्यावर भाष्य करावे.

नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटली. त्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात पडले. या घोटाळ्याचे कनेक्शन थेट गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याशी जोडले आहे. त्यावर भाजप गप्प का? त्यांना युवकांविषयी असतानाही हेच यातून दिसते.

नीट तसेच विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. याबाबत सर्वप्रथम भाजपच्या नेत्यांनी खुलासा करावा. त्यानंतर नैतिकतेच्या गप्पा माराव्यात, असे छाजेड म्हणाले.

अशा कितीही जनतेच्या मूलभूत प्रश्नांची संबंध नसलेल्या विषयांवर भाजप नेते काहीही बोलले तरी देशातील विशेषत: आगामी विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित महायुतीचा पुन्हा एकदा लोकसभा प्रमाणेच लोक पराभव करतील हे लक्षात आल्यामुळे भाजपाचे नेते जनतेच्या मनामध्ये खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे.

भाजपा नेते हे फक्त देशांमध्ये विविध जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे नॅरेटिव्ह यापुढे राज्यातील जनता सहन करणार नाही. आगामी काळात भाजपाचा सपाटून पराभव होईल, असे मत छाजेड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT