Dr Bharti Pawar Politics : डॉ.भारती पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार, हे आहे कारण...!

Dr Bharti Pawar politics, Onion issue politics by opposition : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महायुती भाजपच्या उमेदवार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.
Dr. Bharti Pawar- MP Bhaskar Bhagare
Dr. Bharti Pawar- MP Bhaskar BhagareSarkarnama

Dr Bharti Pawar News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात कांदा प्रश्न प्रचंड गाजला. कांद्याबाबत आवश्यक ते धोरण न घेतल्याने याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला आणि भाजप सरकार त्यामुळे अडचणीत आले. भाजप उमेदवारांचा यामुळे दारुण पराभव झाला.

दिंडोरी मतदार संघात भाजपच्या उमेदवार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा जबरदस्त फटका बसला.येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांच्या प्रचाराचा प्रमुख भर हा कांदा विषयावरच होता. यावरून आता माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.

Dr. Bharti Pawar- MP Bhaskar Bhagare
Akhilesh Yadav : अखिलेश यादव नाशिकच्या शेतकऱ्यांचा 'हा' प्रयोग नेणार उत्तर प्रदेशला

विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नावर मोठे राजकारण केले. त्यामुळे शेतकऱ्यांची (Farmer) दिशाभूल झाली. कांदा प्रश्नावर केंद्रशासन महत्त्वाचे निर्णय घेत होते. नाफेड वरून लासलगाव येथे कांद्याची नियमित तपासणी केली जात होती. केंद्र सरकार पूर्वीपासून तसे करत होते. कांदा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार तोडगा देखील काढत होते. परंतू विरोधकांकडून त्या विषयावर केवळ राजकारण सुरू होते. त्यात शेतकऱ्यांची दिशाभूल झाली, असे डॉ. पवार म्हणाल्या.नवनिर्वाचित खासदार भगरे हे एका षडयंत्रात अडकलेले खासदार आहेत. लोकसभेत ते चुकीच्या लोकांबरोबर बसले आहेत. या शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भगरे यांनाही सुनावले.

Dr. Bharti Pawar- MP Bhaskar Bhagare
ShivrajSingh Politics : कृषिमंत्री चौहान कांदा प्रश्नासाठी नाशिकला देणार भेट !

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात सुरुवातीच्या काळापासूनच कांद्याचा मुद्दा जोरदार गाजला. केंद्र सरकारच्या निर्यात धोरणामुळे कांद्याच्या भावात सातत्याने झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकाच्या रोषाचा डॉ.पवार बसला. खुद्द पंतप्रधानांच्या सभेतही एका तरुणाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे भाषण सुरू असताना याकडे लक्ष वेधले होते. तसेच द्राक्ष निर्यातीचा प्रश्न देखील होता. शेतमालाची देखील हीच परिस्थिती होती. केंद्रीय मंत्री डॉ. भारती यांना मतदारसंघात मोठे हॉस्पिटल उभारता आले नाही. आदिवासी भागात पर्यटन विकास करता आला नसल्याने मतदारांमध्ये डॉ.भारती पवारांबाबत मोठी नाराजी होती.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com