Congress Politics: स्मार्ट सिटी प्रकल्प सातत्याने टीकेचा विषय ठरत आहे. आता काँग्रेस पक्षाने नाशिक शहरातील स्मार्ट सिटी चे पोस्टमार्टम केले आहे. त्यांनी मिळविलेल्या माहितीतून धक्कादायक बाबी पुढे आल्याचा दावा त्यांनी केला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काँग्रेस पक्ष सक्रिय झाला आहे. शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह स्मार्ट सिटी प्रकल्पाविषयी गंभीर तक्रारी मांडल्या. या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही माहिती मिळत नसल्याची टीका त्यांनी केली.
गेल्या नऊ वर्षापासून नाशिक शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. २१ कामांसाठी आतापर्यंत ८५७ कोटींचा खर्च झाला आहे. यातील १७ कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कामांची गुणवत्ता आणि उपयुक्तता दोन्हीही वादग्रस्त असल्याचा आरोप करण्यात आला.
यासंदर्भात काँग्रेस पक्षाने वेळोवेळी प्रशासनाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. काँग्रेसकडून सविस्तर तक्रारी आणि समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. मात्र त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. चौकशी झाली नाही. त्यामुळे आगामी काळात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
स्मार्ट सिटीच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य दाद न दिल्यास यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडून उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. या कामांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असून खरोखर हा खर्च झाला की नाही अशी शंका येते, असे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले.
ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांनी यावेळी स्मार्ट सिटी चे एकही इतिवृत्त अद्याप उपलब्ध झालेले नाही. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नसल्याची बाब पुढे आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये स्मार्ट सिटीच्या समितीची एकही बैठक झालेली नाही. स्मार्ट सिटी ची कामे निकृष्ट दर्जाची असून झालेला खर्च व कामांची गुणवत्ता याचा विचार केलास त्यात मोठी तफावत आहे.
यावेळी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, एनएसयूआय चे अध्यक्ष अल्तमश शेख, धोंडीराम बोडके, सिद्धार्थ गांगुर्डे, संतोष शेवाळे यांनीही स्मार्ट सिटी बाबत विविध माहिती दिली.
-----
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.