Nashik police News: नाशिक शहर सध्या रिक्षा चालकांच्या नियमबाह्य वाहतुकीने त्रस्त आहे. रिक्षा चालकांच्या अरेरावीची झळ थेट महिलांना देखील बसू लागली आहे. त्यामुळे शहरातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत.
https://www.sarkarnama.in/topic/nashik
नाशिक शहरात सध्या पोलिसांनी रिक्षाचालकांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत तशा सूचना दिल्या आहेत. मात्र ही मोहीम रिक्षाचालकांनी जनतेला वेठीस धरल्यावर हाती घेण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात रिक्षाचालकांनी नाशिक शहरात थेट महिलांनाच मारहाण केल्याचे दोन प्रकार घडले आहेत. हे सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकरणात तर विद्यार्थीनींना पाठलाग करून त्रास दिल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
हा अतिशय गंभीर विषय असून देखील या विषयावर राजकीय नेते मात्र फारसे सक्रिय नाहीत. यासंदर्भात कोणत्याही लोकप्रतिनिधीने तोंड उघडलेले नाही. रिक्षा चालकांच्या नियमबाह्य वाहतूक आणि नियमांनाच आव्हान देण्याच्या प्रकारांनी पोलीस देखील हतबल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने पुढाकार घेतला आहे. रिक्षाचालकांवर जर बसेल अशा कारवाईची आवश्यकता आहे. त्यासाठी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पोलीस उपयुक्त पद्मजा बढे यांना निवेदन दिले आहे. याबाबत तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
नियमबाह्य वाहतूक आणि रिक्षा यांच्याकडून होणाऱ्या अनियमित कामकाजावर जर बसेल यासाठी कायद्यात परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि विभागीय महसूल आयुक्त यांना अधिकार आहेत. मात्र गेल्या काही वर्षात याबाबत एकही कारवाई झालेली नाही. त्यासाठी यंत्रणा कसली वाट पहात आहे, हा सामान्यांचा प्रश्न आहे.
नियमबाह्य रिक्षा थांबे आणि सिग्नल वर रिक्षा चालक आणि वाहनधारक यांच्यात हुज्जत नित्याचीच झाली आहे. त्यामुळे ते नियंत्रण आणण्यासाठी तपासणी मोहीम राबवून कारवाई करावी अनधिकृत रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करावे त्यांचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावेत अशी मागणी श्री खैरे यांनी केली आहे.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.