Manish Sisodia Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manish Sisodia : 'आप'च्या सिसोदियांनी आमदार पवारांचं मंत्रिमंडळातील खात सांगितलं...

AAP Manish Sisodia made a big prediction about MLA Rohit Pawar ministership : 'आप' नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते जामखेडमधील शाळा खोल्यांच्या लोकार्पण कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांच्या मंत्रिपदाबाबत मोठं भाकीत वर्तवलं.

Pradeep Pendhare

Ahmednagar Nagar : आम आदमी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री मनीष सिसोदिया यांनी आमदार रोहित पवार यांच्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे.

आमदार पवारांची शिक्षण क्षेत्रातील सुधारणांविषयांची तळमळ पाहता, ते चांगले शिक्षण मंत्री होऊ शकतात, असं भाकीत मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केलं आहे.

आम आदमी पक्षाचे (AAP) नेते मनीष सिसोदिया गेल्या दोन दिवसांपासून नगर दौऱ्यावर आहेत. आमदार रोहित पवार त्यांच्याबरोबर आहेत. शिर्डी इथं साईसमाधीचं दर्शन घेतलं. आज जामखेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचं लोकर्पण झालं. यावेळी मनीष सिसोदिया यांनी शिक्षण व्यवस्थेवर काम झाल्यास भारत देश विश्वगुरू होईल, असं सांगितलं.

मनीष सिसोदिया म्हणाले, "रोहित पवार यांनी शाळांच्या वर्गखोल्या उभारल्या आणि त्याचं लोकार्पण दुसऱ्या पक्षाच्या आमदारांकडून केल, हे नवीन पिढीचं आदर्श, असं राजकारण घालून दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naraendra Modi) यांच्या मिलियन, ट्रिलियन विकासाची राजनीती, मला समजत नाही. पंतप्रधानांना मिलिनय, ट्रिलियनमधील सर्व झिरो माहिती. पण, त्यांच्या विकसित भारतामध्ये जुमलेबाजीचं राजकारण दिसते आहे". भारत जेव्हा 2046 मध्ये शंभर वर्षांचा होईल, तेव्हा मिलियन, ट्रिलियनची गोष्ट होत असतील. पण ट्रिलियन, बिलियन डाॅलरच्या गोष्टी करताना, जी व्यक्ती शिक्षण व्यवस्थेवर बोलत नसेल, तेव्हा समजून चला की, ती व्यक्ती तुम्हाला मुर्ख बनवत आहे, असा टोला सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

"रोहित पवार यांनी शिक्षण व्यवस्थेवर खूप काम करत आहेत. सध्या राजकारणात कोणीही शिक्षण व्यवस्थेवर काम करायला तयार नाही. सत्तेत आल्यानंतर नेते, आमदार पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम खातं कसं मिळेल, हे पाहतो. ज्या खात्यात जास्त ठेके दिले जातात, त्या खात्याचा मंत्री होण्यासाठी चढाओढ लागते. शिक्षण देणाऱ्या खात्याचा विचार नंतर होतो. आमदार रोहित पवारांची शिक्षण व्यवस्थेतील ही तळमळ पाहाता, भविष्यात ते शिक्षणमंत्री झाल्यास महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करतील", असं भाकीत मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केलं.

शाळा किती बांधल्या ते विचारा

"दिल्लीमधील सरकारी शाळांची परिस्थिती खूपच खराब होती. महाराष्ट्रातील सरकारी शाळा खूप चांगल्या होत्या. शाळेत शिक्षकच नव्हते. अशा शाळांमध्ये भविष्यातील भारत तयार होत होता. हे चित्र पाहून, रडू आलं आणि परिस्थितीची संघर्ष करून चित्र बदललं, असं सांगून विधानसभा निवडणुकात राज्यात होणार आहेत. मत मागण्यासाठी पक्षाचे लोक येतील. त्यावेळी त्यांना नेत्यांना विचार की, तुम्ही शाळा किती बांधल्या? शिक्षण व्यवस्थेवरच काम करणाऱ्यालाच मतदान झालं पाहिजे. असे झाल्यास भारत जगात विश्वगुरू होईल", असं मनीष सिसोदिया यांनी सांगितलं.

वर्ग खोल्यांचा निधी दाबून ठेवला

'दिल्लीमधील आप नेते तथा माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित जामखेडच्या मिरजगावमधील शाळेचे लोकर्पण झालं. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी 20 खोल्यांची मागणी केली. यावर आमदार पवार यांनी 22 खोल्या देणार असल्याचं सांगितलं. भावी पिढीसाठी काम करत असताना या शाळांचा निधी विरोधकांनी दाबून ठेवल्याचा आरोप', आमदार पवारांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT