Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Abdul Sattar; रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा असे सुचवले होते!

Sampat Devgire

नाशिक : राज्यात (Maharashtra) उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांचे सरकार असताना ते आजारी होते. तेव्हा अनेक अडचणी येत होत्या. त्यावेळी मी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या मुख्यमंत्री म्हणून रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना करण्यात यावे, असे मी सांगितले होते, असा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला. (Agreeculture minister Abdul sattar criticised Uddhav Thackrey)

नाशिकमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अब्दुल सत्तार हे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या बंडाचे समर्थन केले. उध्दव ठाकरे यांच्या बरोबर आम्ही राहिलो असतो तर आमचे राजकीय भवितव्य संकटात आले असते.

यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विरोधकांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. सीमावादाबाबत महाराष्ट्र कधीही तडजोड करणार नाही. दोन्ही बाजूला भाजप सरकार आहे. त्यामुळे अमित शहा तोडगा करतील. भविष्यात असे वाद होणार नाही, यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे. या विषयावर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत आहे. यामध्ये केंद्र सरकार आपल्याला न्याय देईल. महाराष्ट्रच्या हिताचे जे बोलतील त्या सोबत आम्ही आहोत. मग अजितदादा असो की कोणीही असो आम्ही सोबत असल्याचे कर्नाटक वादावर ते म्हणाले.

सत्तार म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी 48 तासांची मुदत दिली. ते महाराष्ट्रच्या बाजूनं बोलले, आम्ही त्यांच्या विधान विरोधात नाही. दुसरीकडे संजय राऊत काही काळ आत राहून आलेत, त्यामुळे त्यांना कुलूप आठवतात. तिकडे सुषमा अंधारे पेटून उठल्या आहेत. अंधारे बहीण नक्कल करते. त्या विषयी काय बोलणार, उलट त्या बोलल्याने आमची मत अधिक वाढतात, त्यांनी बोलावं, मात्र नक्कल करायला अक्कल लागते, असा चिमटाही त्यांनी घेतला.

एकनाथ शिंदे यांचे सरकार निवडणुकीला सरकार घाबरत नाही, ग्रामपंचायत सहकार अशा निवडणूक होत आहेत. गुजरात ची निवडणूक होती, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते प्रक्रियामध्ये होते, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे मिळुन विस्तार करतील, त्यामुळे लवकरच विस्तार होईल.

सध्या उद्धव ठाकरे राज्यातील अनेक भागातील दौरे करत आहेत. घरात राहणारे आता बाहेर पडत आहेत. चांगली गोष्ट असून प्रत्येकाने बाहेर फिरायला पाहिजे, कारण यातून पक्षवाढीस मदत होते. त्यामुळे आता सर्वच बाहेर फिरत आहेत. राहुल गांधी भारत जोडोच्या माध्यमातून फिरत आहेत, त्यामुळे त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये फायदा झाला. राहुल गांधीना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढा फायदा उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्रात होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT