Devendra Fadanvis; देवेंद्र फडणवीस ठरले समृद्धीचे यशस्वी कॅप्टन!

समृद्धी महामार्ग होणार महाराष्ट्राचा पहिला ग्रीन फिल्ड इंडस्ट्रियल कॉरिडॉर
Devendra Fadanvis, Prime minister Narendra Modi & Chief Minister Eknath Shinde
Devendra Fadanvis, Prime minister Narendra Modi & Chief Minister Eknath ShindeSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : समृद्धी महामार्गाचं (Samruddhi highway) सर्वार्थानं श्रेय खऱ्या अर्थानं कुणाला द्यायचं झाल्यास ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला द्यायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज त्याचे लोकार्पण होत आहे. (PM Narendra modi will hand over samruddhi highway project tonation)

Devendra Fadanvis, Prime minister Narendra Modi & Chief Minister Eknath Shinde
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक ; ११ पोलिसांवर मोठी कारवाई

हे श्रेय निर्विवादपणे जसं फडणवीस यांचं हे, तसं ते काही अंशी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही आहे. जेव्हा समृद्धी महामार्गाची मुहूर्तमेढ देवेंद्र फडणवीस यांनी रोवली, तेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई-नागपूरला जोडणारा थेट महामार्ग होऊ शकतो, अशी कल्पनाही तेव्हा कुणी केली नव्हती.

Devendra Fadanvis, Prime minister Narendra Modi & Chief Minister Eknath Shinde
MNS : मी मनसे सोडावी, असं पक्षातील काहींना वाटतयं..; मोरें म्हणाले, मी राज साहेबांना स्पष्ट सांगितलं..

हा राज्याच्या समृद्धीचा विकासाचा महामार्ग ठरेल, हे व्हीजन ठेवून या महामार्गाची पायाभरणी फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी हा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा आणि मुलभूत प्रकल्प ठरणार आहे. कदाचित नावाप्रमाणे महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेनं नेणारा हा प्रकल्प ठरेल, यात शंका नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेलं लोकार्पण राज्यासाठी त्यामुळेच विशेष महत्त्वाचं आहे. समृद्धीला मूर्त रुप देण्यात राधेश्याम मोपलवार आणि डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचंही योगदान मोठं आहे.

देवेंद्र फडणवीस आमदार असतानापासून नागपूर-मुंबई अंतर कमी करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होते. प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाल्यावर या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली. या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जातीनं लक्ष दिलं. मुख्यमंत्री वॉर रुमच्या माध्यमातून दर टप्प्याला, गतिमान पद्धतीनं आढावा घेण्यात फडणवीस यांचा हातखंडा होता. त्यामुळेच अल्पावधीत आता हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. राज्यातील पहिला ग्रीनफिल्ड इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अशी समृद्धी महामार्गाची नोंद होणार आहे. समृद्धी महामार्गासाठी सर्वाधिक गतीनं भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. ८ हजार ८०० हेक्टर जागा अवघ्या १२ महिन्यात भूसंपादीत करुन त्यासाठी राज्य सरकारनं ८ हजार ३ कोटी रुपये अदा केले. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५५ हजार ३५५ कोटी एवढा होणार आहे.

प्रति तास १५० किलोमीटर वेगाने वाहनं धावणार असल्याने मुंबई-नागपूर हा प्रवास १७ तासांवरुन सात तासांवर येणार आहे. नागपूरच्या मिहान कॉरिडॉरशी कनेक्टिविटी निर्माण झाल्यानं समृद्धी महामार्ग इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल. विशेष म्हणजे राज्यातील औद्योगिक वाढीला चालना मिळावी, यासाठी समृद्धी महामार्गालगत औद्योगिक वसाहती निर्माण करण्यासाठी इंडस्ट्रीयल भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत. पर्यायानं या महामार्गामुळे एका रेषेत आलेले २० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांचा त्याचा थेट लाभ होणार आहे. महामार्गालगत सुमारे १५ ते २० लाख रोजगार निर्मिती यामुळे होणार आहे. रस्ते, महामार्ग हे राज्याच्या, देशाच्या धमन्या असतात, ही उक्ती या महामार्गामुळे सार्थ ठरणार आहे. समृद्धी हा देशातील सर्वांत मोठा हरित मार्ग ठरणार असून या महामार्गाच्या दोन्ही बाजुंनी ११ लाख वृक्ष असणार आहेत.

विदर्भ, मराठवाड्याशी मुंबईची कनेक्टीविटी ज्याप्रमाणे होईल, तसेच उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख भाग देखील मुंबई आणि मराठवाडा, विदर्भाशी अधिक सक्षमपणे जोडला जाईल. विशेषतः नाशिक हे मुंबईच्या अधिक जवळ येईल. नाशिकच्या शेती मालासह अन्य वाहतुकीसाठी समृद्धी महामार्गाचा अत्यंत चांगला वापर होणार आहे. खानदेशमधून थेट समृद्धी जाणार नसला तरी मराठवाड्याजवळून खानदेशात जाणारे मार्ग अधिक सक्षम समृद्धीमुळे होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होत असलेला पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी पर्यंतचा आहे. उर्वरित शिर्डी ते मुंबई १८१ किलोमीटरचा दुसरा टप्पा पुढच्या सहा महिन्यात पूर्णत्वास येणार आहे.

नाशिक ही पुरातन धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक नगरी आहे. साहित्य, कलेता मोठा वारसा नाशिकला लाभला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून दूर असलेले नाशिक पुढच्या ७-८ वर्षांमध्ये राज्याच्या, देशाच्या आणि जगाच्या नकाशावर ठळकपणे येणार आहे. त्याची दमदार प्रारंभ समृद्धीच्या निमित्ताने होऊ घातला आहे. विकासाचा अनुशेष असलेल्या, विकासाची भूक असलेल्या भागातून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गामुळे शेती व शेतकरी, उद्योग-व्यापार यांना चालना मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com