Ahmednagar Crime News : बिल मंजूर करण्यासाठी बिलावर 18 टक्के लाच घेतल्याप्रकरणी दोन महिला अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने कारवाई केली आहे. कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंत्यावर 62 हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झाली आहे.
पाटबंधारे संशोधन व जलनिस्सारण उपविभागाच्या सहायक अभियंता रुबिया मोहम्मद हनिफ शेख आणि पाटबंधारे संशोधन विभागाच्या कार्यकारी अभियंता रजनी पाटील या दोघींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ACB bribery department has taken action against the female executive engineer
पाटबंधारे विभागामार्फत तक्रारदाराने उंबरे (ता. राहुरी) येथे चारीचे काम केले होते. या कामाचे बिल 7 लाख 75 हजार 963 रुपये झाले होते. या बिल मंजुरी करण्यापोटी शेख हिने स्वतःसाठी आठ टक्के आणि पाटील यांच्यासाठी दहा टक्के अशी एकूण 18 टक्केप्रमाणे 1 लाख 39 हजार 500 रुपयांची लाचेची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाकडे तक्रार केली आहे. या लाचेच्या तक्रारीची पथकाने पडताळणी केली. यात तथ्य आढळले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यानंतर रुबिया शेख यांनी 18 टक्क्यांचा पहिला हप्ता म्हणून 62 हजार रुपये स्वीकारले. ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपतच्या नगर पथकाने रुबिना शेख यांना ताब्यात घेतले. शेख यांनी पथकाने केलेल्या चौकशीत रजनी पाटील यांनीदेखील लाचेची रक्कम मागितल्याचा दुजोरा दिला. त्यामुळे शेख यांच्यासह पाटीलवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी ही कारवाई केली. पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, किशोर लाड, महिला अंमलदार राधा खेमनर, सना सय्यद, पोलिस अंमलदार हरून शेख कारवाईत सहभागी झाले होते.
R