Utkarsha Rupwate: ...अखेर शिर्डीत 'मविआ'ला ज्याची भीती होती, तीच गोष्ट घडली! वंचितकडून उत्कर्षा रुपवतेंना उमेदवारी

Shirdi Loksabha Election 2024 : शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते या नाराज होत्या.
Utkarsha Rupwate News
Utkarsha Rupwate NewsSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : शिर्डीमधून शिंदे गटाचे सीटिग खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात 'हाय व्हाल्टेज'सामना होणार आहे. मात्र, आता शिर्डीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसचा 'हात' सोडल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर आता रुपवते यांना वंचितकडून शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसचा 'हात'सोडून 24 तास होण्यापूर्वीच उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Shirdi Lok Sabha Election 2024) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला.

Utkarsha Rupwate News
Nilesh Lanke News : नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुल गांधी अहमदनगरमध्ये येणार?

शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते या नाराज होत्या. ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची आग्रही मागणी ठाम मागणी होती.

मागणी मान्य न झाल्याने त्यांनी काल सायंकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. या वेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीची सुरू असतानाचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी पक्षाचा 'हात' सोडला आहे. त्यांना काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडल्याने रूपवते या नाराज होत्या. ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची आग्रही मागणी ठाम मागणी होती. मात्र आता त्यांनी राजीनामा अस्त्र उगारले होते.

हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. मात्र, जागावाटपात शिर्डी ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने उत्कर्षा रूपवते नाराज झाल्या होत्या. त्यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यामुळे आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उत्कर्षा रूपवते या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत (VBA) प्रवेश करण्याची शक्यता आहे. उत्कर्षा रूपवते या अकोल्यात दाखल झाल्या असून आज रात्रीच त्यांचा पक्षप्रवेश पार पडण्याची शक्यता आहे.

Utkarsha Rupwate News
Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी मतदारांशी महागद्दारी केली; शिरूरमध्ये महायुती आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com