Sujay Vikhe - Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Lok Sabha Exit Poll : विखे-लंकेंचा महामुकाबला; मतमोजणीला 5 आयपीएस, 8 डीवायएसपी अन् 3 हजार काँस्टेबलचा पहारा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : एक्झिच पोलचा अंदाजानुसार लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना धोबीपछाड मिळत असून, महाविकास आघाडीला यश मिळताना दिसते आहे. या अंदाजामुळे निवांत असलेलं जिल्हा प्रशासन देखील तणावाखाली आले आहे. उद्या मतमोजणी ठिकाणी त्रिस्तरीय बंदोबस्त राहणार असून, पाच आयपीएस, आठ डीवायएसपी अन् चार हजार काँस्टेबलचा पाहारा असणार आहे. तसेच नगर जिल्ह्यातील संवेदनशील भागात जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मार्फत बंदोबस्त वाढ केली आहे.

नगर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार खासदार म्हणून आहेत. यावेळी त्यांना पुन्हा महायुतीकडून संधी देण्यात आली. अटीतटीची लढाई झाली. महायुतीच्या उमेदवारांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं उतरली. परिणाम निवडणूक अटीतटीची झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप (BJP) उमेदवार खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्यात फाइट झाली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, एकनाथ शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांच्यात लढत अटीतटीची लढत झाली.

मतदानानंतर दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात आहे. परंतु एक तारखेला अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोल (Exit Poll) आले. यात नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा पिछाडीवर दाखवण्यात आला. हा एक्झिट पोल महायुतीला धक्का असल्याचं मानलं जात आहे. एक्झिट पोलचा महायुती आणि महाविकास आघाडीवरच परिणाम झालेला नाही तर, प्रशासनावर देखील झाला आहे.

मतमोजणी ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. तसेच नगर जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलिसांमार्फत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त असेल. दुसऱ्या टप्प्यात 'सीआरपीएफ'चा आणि तिसऱ्या टप्प्यात 'सीएपीएफ'चा बंदोबस्त राहणार आहे. हा संपूर्ण बंदोबस्त शस्त्रधारी असणार आहे. जवळजवळ तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतमोजणीच्या ठिकाणी इलेक्ट्रानिक्स उपकरणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मोबाईल, इलेक्ट्रानिक्स उपकरणं घेऊन न येण्याचं आवाहन केलं आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. प

हिल्यादांचा टपाल मतमोजणी होईल. ही मतमोजणी अर्धा तास चालेल. यानंतर ईव्हीएम मशिनवरची मतमोजणी सुरूवात होईल. दुपारपर्यंत निकालाचा ट्रेंड सेट होईल. अंतिम निकाल रात्री दहा वाजेपर्यंत निश्चित होईल. नगर जिल्ह्यातील केबलवर वेळोवेळी निकाल दिला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT