Ajit Pawar & Aditi Tatkare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: मंत्री अदिती तटकरे; पालकमंत्रीपद तिढयावर YES, पक्ष विलीनीकरणावर मात्र NO!

Aditi Takare; dispute of Guardian minister; Devendra fadnavis and Ajit Pawar both have focus on Raigad and Nashik-मंत्री अदिती तटकरे यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर मात्र आपले मौन सोडले आहे.

Sampat Devgire

Aditi Tatkare News: महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री विषयावर आपले मौन सोडले आहे. या दोन्ही पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. हा तिढा सोडविणे आव्हान ठरले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज राज्याच्या राजकारणाला धक्का देणारे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र यावेत असे लोकप्रतिनिधींना वाटते. शरद पवार पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासासाठी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याची इच्छा असल्याचे विधान त्यांनी केले.

त्यामुळे सबंध महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक नेत्यांनी यावर अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी यावर बोलणेच टाळले आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील या विषयावर कानावर हात ठेवले.

मंत्री तटकरे म्हणाल्या, हा वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावरील प्रश्न आहे. मी याबाबत काय मतप्रदर्शन केले याविषयी मी काहीही बोलू शकत नाही. मला त्याची माहिती देखील नाही. वरिष्ठ घेतील तो निर्णय आम्ही सगळे पाळतो. त्यामुळे यावर भाष्य करणे उचित होणार नाही.

आम्ही सर्व सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर पक्षाचा निर्णय काय होतो हा आमचा विषय नाही. त्यामुळे याबाबत काहीही न बोलणे उचित ठरेल. मंत्री तटकरे यांनी राज्याच्या राजकारणात नवे तरंग उमटविणाऱ्या विषयावर अतिशय सावध भूमिका घेतली.

नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप संपलेला नाही. मंत्री तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र त्याला लगेचच स्थगिती देण्यात आली होती. रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचे नियुक्तीचे वाद एकमेकांशी निगडित आहेत. हा वाद थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यातून तोडगा निघू शकला नाही.

या संदर्भात मंत्री तटकरे म्हणाल्या, या दोन्ही जिल्ह्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच सगळ्याच नेत्यांचे बारीक लक्ष आहे. कामे थांबू नयेत आणि मंजूर झालेला सर्व निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा हा मुख्य विषय आहे. यासाठी हे नेते बारीक लक्ष ठेवून आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत आम्ही दक्ष आहोत. पालकमंत्री कोण असेल? हा तिढा योग्य वेळी सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT