Political leaders 
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'दिल्ली'नंतर आता 'गल्ली'चे वेध; उमेदवारीसाठी इच्छुकांची चाचपणी सुरु

Pradeep Pendhare

Maharashtra Local Leaders : देशात लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच, स्थानिक नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. परंतु अगोदर विधानसभा की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

भाजप चारशे पारचा नारा देत लोकसभा निवडणुकाला समोरा गेला आहे. पहिल्या तीन टप्प्यात भाजपला (BJP) महाराष्ट्रात म्हणावा, तसा प्रतिसाद मिळाला नाही. चौथ्या टप्प्यापासून भाजप आक्रमक झाली आहे. यावेळी मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे भाजप नेत्यांनी स्थानिक नेत्यांना गट, गण, प्रभाग, विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवून द्या आणि पुढच्या निवडणुकांचे तिकीट घेऊन जा.अशीच एकप्रकारे ऑफर दिल्याचे दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) सर्वच पक्षाचे स्थानिक नेते लोकसभेच्या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतःच्या उमेदवारीची चाचपणी करताना दिसले. आता महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडल्या आहेत. राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक नेमले आहेत. प्रशासक राज येऊन आता त्याला दोन वर्षे पूर्ण झाली. प्रशासक राज असल्यामुळे स्थानिक नेत्यांची 'नेतेगिरी'च थांबली आहे. यामुळे नेत्यांमध्ये नाराजी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक राज असल्याने त्यांना फिल्डवर काय चालले आहे हे, कळत नाही, असा आरोप स्थानिक नेत्यांचा आहे. प्रशासक राजमुळे गावगाड्याचे प्रशासकीय पातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित दिसतात.

देशातील हवामानात बदल झालेला आहे. तसेच राज्यातील ग्रामीण भागात अवकाळी आणि वादळी पावसाचे संकट आले आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि वादळी पाऊस झाला. यातून पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले. प्रशासक राज असल्यामुळे त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहोचत नाही. अवकाळी पाऊस होत असला, तरी ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई आहे. तीव्र ऊन आणि त्यातून निर्माण झालेली पाणी टंचाईमुळे पिकांचे नुकसान होत आहे.

धरणातील पाण्याची मागणी होताना दिसते. यासाठी प्रशासनाकडे नियोजन दिसत नाही. कारभारात लोकप्रतिनिधींचा सहभाग असता तर, कामे सोपी झाली असती. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT