NCP Ajit Pawar On Shrirang Barne: मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगूनही युती धर्म पाळला नाही. तसेच ज्या कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला नाही त्यांच्या नावांची यादी मी अजित पवार यांना दिली असल्याचं वक्तव्य महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केलं होतं. बारणेंच्या याच वक्तव्यावर आता अजित पवार गटाने स्पष्टीकरण दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी बारणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, "अजित पवार आणि पार्थ पवार यांनी स्वतः बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचे काम करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पक्षातील सर्व नेते मंडळी आणि आमदारांनी बारणे यांचे काम केलं आहे. मात्र पक्षातील काही खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये बारणे यांनी 2019 मध्ये पार्थ पवारांचा पराभव केल्याची नाराजी अजूनही आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र आघाडीत काम करत असताना अशा गोष्टी आघाडी धर्मात स्वीकाराव्या लागतात असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिलं. तसंच श्रीरंग बारणेंचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मोठ्या मतांनी विजय होईल असा विश्वासदेखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना बारणे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता काही कारणाने दुखावला गेला होता. त्यामुळे मावळ मतदारसंघातील अजित पवार (Ajit Pawar) गटाने माझा प्रचार शंभर टक्के केला नाही. ज्यांनी प्रचार केला नाही. तर प्रचार न करणाऱ्यांची नावे अजित पवारांकडे नावे दिली आहेत. पवार गटाने प्रचार केला नसला तरीही माझा विजय जवळपास अडीच लाखाच्या मताधिक्याने होईल. परंतु अजित पवार गटाने पूर्ण ताकदीने माझं काम केलं असतं तर विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं.
मावळ लोकसभा (Maval Lok Sabha) क्षेत्रात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची कुठलीही ताकद नसल्याने आणि मागील निकाल पाहता, मतदारांचा कौल पाहता अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी माझा विजय होईल. चिंचवड आणि पनवेल विधानसभेतून मला खूप लीड मिळेल. चिंचवडमधून लाखापेक्षा जास्त तर पनवेल मधून 70 ते 80 हजाराचं लीड मिळेल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.