New Delhi political News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) काँग्रेस आणि आपमध्ये दिल्लीसह इतर काही राज्यांमध्ये आघाडी झाली आहे. पण प्रत्यक्षात दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकदाही एका व्यासपीठावर आले नाहीत. त्यामुळे दिल्ली काबीज कसे करणार, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे. प्रचारासाठी आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि काँग्रेसचे नेते एकदाही एकत्रितपणे प्रचाराला आले नाहीत. ना रोड शो झाला, ना प्रचार सभा. त्यामुळे आता आघाडीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून देशभरात काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) तर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण दिल्लीकडे राहुल यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. (Latest Political News)
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam Case) अरविंद केजरीवालांना मार्च महिन्यात ईडीने (ED) अटक केली होती. काही दिवसांपुर्वीच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) त्यांना लोकसभेच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर केजरीवाल दिल्लीसह इतर राज्यांमध्ये आपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. ते मुंबईतही येऊन गेले. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर एकदाही राहुल गांधी आणि केजरीवाल एकाच व्यासपीठावर आलेले नाहीत. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिल्लीतील सात मतदारसंघांमध्ये 25 मेला मतदान होणार आहे. प्रचारासाठी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. केजरीवालांनी आपचे (AAP) चार आणि काँग्रेसच्या (Congress) तीन उमेदवारांसाठी रोड शो केला. सभाही घेत आहेत. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी आपच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उमेदवारासाठी एकच सभा झाली आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एक सभा घेणार आहेत. पण दोन्ही सभांना केजरीवाल निमंत्रित नाहीत. विशेष म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या सभेसाठीही केजरीवाल निमंत्रित नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
केजरीवालांना अटक केल्यानंतर राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या सभेत जोरदार भाषण केले होते. पण प्रत्यक्ष केजरीवाल प्रचारात उतरल्यानंतर दोघांनी एकत्रितपणे प्रचार केलेला नाही. आता ही जाणीवपुर्वक तयार केलेली रणनीती आहे की भविष्यात राजकीय घडामोडींचे संकेत, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.