Dr Bharti Pawar
Dr Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भारती पवारांनी खडसावले, दिवाळीत शेतकऱ्यांना अंधारात ढकलू नका!

Sampat Devgire

निफाड : सध्या शेतीची कामे सुरू असून पिकांना पाणी देण्यासाठी विजेची गरज आहे, शेतकऱ्यांच्या हातात पैसा येताच तो वीजबिल नक्की भरून सवलत योजनेचा फायदा घेईल, मात्र तूर्त त्याची वीज खंडीत करू नका असे सक्त आदेश देतानाच शेतीची विजबिले अंदाजे नको तर मीटर रिडिंग घेऊनच द्यावीत, सेतकऱ्यांची फसवणूक टाळावी अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Centre minister of state Dr Bharti Pawar) यांनी दिल्या.

खंडीत वीजप्रश्नी वीज वितरणच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण बैठक श्रीमती पवार यांच्या उपस्थितीत झाली. बिल न भरलेल्या शेतकऱ्यांचे कनेकश्न थेट कट केले जात आहेत., यासह विविध प्रश्नांवर योग्य मार्ग काढण्यासाठी वीज मंडळांच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

सध्या दिवाळीचा सण सुरू आहे, बळीराजाची दिवाळी अंधारात घालवू नका. शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले तर ते बिले भरू शकतील. घरातल्या विजबिलाची रक्कम मिटरचे युनिट तपासून दिले जाते, मात्र शेतीचे वीजबिल अंदाजे दिले जाते, ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून त्यांच्यावर होणारा अन्याय त्वरित थांबवावा असे मंत्री डॉ. पवार म्हणाल्या.

वीज थकीत असल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या पथदीपांचा पुरवठा खंडित केल्याने त्या अंधारात आहे. डी.पी. कनेक्शन तोडू नका, नादुरूस्त असलेल्या डी.पी. लवकर दुरुस्त करा, अनेक शेतकऱ्यांनी आगाऊ रक्कम भरून नवीन डीपीसाठी मागणी केली आहे, त्यांना लवकरात लवकर डीपी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केली.

या बैठकीस नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, मालेगावचे अधीक्षक अभियंता सानप, कार्यकारी अभियंता डोंगरे, यांच्यासह सुवर्णा जगताप, भागवतबाबा बोरस्ते, यतीन कदम, दीपक खैरनार, बापू पाटील, सतीश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT