Maharashtra Cooperative Banks Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Cooperative Banks : कर्जमाफीच्या निर्णयाचा सहकारी बँकांना झटका : अहिल्यानगर डीसीसी बँकेचे 114 कोटींचे व्याज बुडणार?

Banks seek interest compensation as Maharashtra loan waiver implementation begins : 31 मार्च 2026 पर्यंतचे पीककर्ज माफ; 1 एप्रिलपासून व्याज न आकारण्याचे सरकारचे निर्देश, मात्र पाच महिन्यांच्या व्याजाची भरपाई कोण करणार याबाबत अद्यापही अनिश्चितता

Pradeep Pendhare

Ahilyadevi Holkar Loan Waiver : राज्य सरकारने 2 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 31 मार्च 2026 पर्यंत थकीत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात सरकारने बँकांना 1 एप्रिल 2026 पासून संबंधित कर्जांवर व्याज आकारू नये, असे निर्देश दिले आहेत.

योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी 26 जुलैपासून सुरू झाली असली, तरी कर्जमाफीची (Loan Waiver) रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा होण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार आहे. त्यामुळे एप्रिल ते जुलै या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत संबंधित कर्जांवरील व्याज बँकांना मिळणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Bank) सुमारे 114 कोटी रुपयांच्या व्याजाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे व्याज उत्पन्नात होणारी ही घट बँकेसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

सध्या या व्याजाच्या रकमेची भरपाई राज्य सरकार करणार की त्याचा भार संबंधित बँकांनाच सहन करावा लागणार, याबाबत अद्याप स्पष्ट धोरण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह इतर बँकांमध्येही अनिश्चिततेचे वातावरण आहे.

दरम्यान, या पाच महिन्यांच्या व्याजाची भरपाई शासनाकडून मिळावी, यासाठी संबंधित बँकांकडून सरकारकडे मागणी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसोबतच व्याज भरपाईबाबत सरकार कोणता निर्णय घेते, याकडे बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT