Ahilyanagar Ambedkar statue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Ambedkar statue delay : आंबेडकर पुतळा अनावरणाचा वाद पेटला, बाळासाहेबांचा आदेश येताच..; जगतापांना 'वंचित'चा खुला इशारा

Ahilyanagar Ambedkar Statue Delay VBA Yogesh Sathe Criticizes NCP MLA Sangram Jagtap : अहिल्यानगर शहरातील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा खुला करण्यासाठी होत असलेल्या विलंबावर आंबेडकरी चळवळ नाराज आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Ambedkar statue controversy : अहिल्यानगर शहरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम पूर्ण झालं असून, तो खुला होण्यासाठी विलंब होत असल्याने त्यावरून आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष पसरला आहे.

या पुतळ्याच्या उद्घाटन वारंवार पुढं ढकललं जात आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश येताच, कोणत्याही क्षणी पुतळा खुला करू, असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी दिला आहे.

योगेश साठे म्हणाले, "भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीवर आम्ही पक्षाच्यावतीने बहिष्कार टाकला आहे". बाबासाहेबांचं नाव घेता, फुले, शिवरायांचे नाव घेता, या महापुरूषांनी कधीच जातीवाद केला नाही. त्यांनी समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे काम केले नाही. पण याच महापुरुषांचे नाव घेऊन हे काम तुम्ही करत आहात, असा गंभीर आरोप योगेश साठे यांनी केला.

'यामुळे तुमच्याबरोबर किंवा तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अजिबात इच्छा नाही. तुम्ही पुतळा खुला करा, कधी करायचं ते तुम्ही ठरवा. तारीख निश्चित करता. परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश दिल्यास तो पुतळा आम्ही कधीही खुला करू शकतो. समाजासाठी खुला करू शकतो', असा इशारा वंचितचे (VBA) योगेश साठे यांनी दिला.

समाजाने सावध व्हावं

तसेच, 'फुले-आंबेडकर-शाहू समाजाला आवाहन करताना योगेश साठे म्हणाले की, सनातनी हिंदू संघटना आहे, ते फुले-आंबेडकर-शाहू यांचे नाव घेऊन, फोटो वापरून, समाजाची दिशाभूल करत आहे. अशा संघटनांना समाजानेच प्रत्युत्तर म्हणून बंदी घातली पाहिजे', अशी मागणी योगेश साठे यांनी केली.

तथाकथित सनातनी आंबेडकरवादी...

'महापुरूषांनी हजारो वर्षांच्या गुलामीतून आपल्याला बाहेर काढले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. त्यांनी जातीवाद केला नाही. महापुरूषांच्या नावाखाली तथाकथित सनातनी आंबेडकरवादी असतील, किंवा हिंदुत्ववादी असतील, हे समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रवृत्तींना वेळीच उत्तर दिली पाहिजे. यांना आवर घातला नाही, तर जिल्ह्यातच काय, तर राज्यात दंगल घडवतील', अशी भीती देखील योगेश साठे यांनी व्यक्त केली.

पुतळ्याच्या अनावरणाची तारीख ठरली

दरम्यान, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीने आज तातडीने पुतळा अनावरची बैठक घेतली. याच बैठकीवर वंचित बहुजन आघाडीने बहिष्कार घातला होता. या समितीच्या बैठकीत, पुतळ्याचे उद्घाटन 27 जुलैला सायंकाळी सहा वाजता होणार असल्याचे ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली. 27 जुलै 1985 रोजी विधिमंडळात बाबासाहेबांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव पारीत केला होता. याच दिवशी पुतळ्याचे अनावरण करण्याचे बैठकीत ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT