Ahilyanagar politics : भाजपच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मंडलाध्यक्षांच्या नियुक्तींवरून अंतर्गत वाद उफळला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाने जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर एकहाती वर्चस्व वाढल्यानं इतर स्थानिक नेत्यांकडून त्याला आव्हान दिलं जाऊ लागलं आहे. याबाबत थेट पक्ष नेतृत्वांकडे तक्रारी झाल्या.
पक्ष नेतृत्वाने देखील या तक्रारींची दखल घेत, काही ठिकाणी हस्तक्षेप केला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील शिर्डी इथं बैठक झाली. अहिल्यानगरमधील पक्ष संघटनेमधील मतभेदावरून मंत्री विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "पक्ष मोठा झाली की, त्यात मतभेद होतात. मात्र जे कायमस्वरूपी असंतुष्य राहिले, त्यांना संतु्ष्ट करता येत नाही. बॅनरबाजी कोण करतं, याची दखल घेण्याची आवश्यकता नाही". श्रीरामपूर वगळता कुठेही नाराजी नाही, असा दावा देखील मंत्री विखे पाटील यांनी केला.
'जिल्ह्यातील अन्य काही भागात पदाधिकाऱ्यांची नाराजी असेल, तर तिथं सुद्धा असे लक्षात येते की, ज्यांची पक्षातून हकालपट्टी केली, तेच नाराज आहे. अनेकांची इच्छा आहे की, पक्ष संघटनेत पदावर संधी मिळावी. पण पद एकच असल्याने अनेकांना संधी देता येणार नाही, मात्र कार्यकर्त्यांवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही', असेही मंत्री विखे यांनी म्हटले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यानंतर तिथं महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक अडकले होते. महायुतीमधील भाजपनं मंत्री गिरीश महाजन यांना पाठवल्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जम्मू-काश्मीर इथं पोचून अडकलेल्या पर्यटकांना मदतीला पोचले. यातून श्रेयवादाची लढाई रंगल्याची चर्चा आहे. त्यावर भाजप मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे तिथं जबाबदारीतून पोचले. राज्यात महायुती सरकार एकमेकांना पूरक असं काम करत आहे, असे सांगून मंत्री विखे यांनी महायुतीची बाजू सावरली.
पहलगाम घटनेतील पर्यटकांना विमानातून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रात परत आणल्यावर, त्यावर ठाण्यातील खासदार नरेश म्हस्के यांनी जे कधीही विमानात बसले नाहीत, त्यांना शिंदेंनी आणले, असे विधान केले. त्यावर प्रतिक्रिया देताना, मंत्री विखे पाटील यांनी पहलगाम इथला दहशतवाही हल्ला हा मानवतेला काळीमा फासणार आहे. अतिरेक्यांचा बंदोबस्त केला जाईल, तशी पंतप्रधान मोदींनी देखील भूमिका घेतली आहे. संपूर्ण देश पंतप्रधानांच्या मागे उभा असताना, अशी बेताल वक्तव्य कोणी करत असेल, तर ते दुर्दैव आहे, असा टोला, खासदार म्हस्के यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.