BJP Vikhe support NCP Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vikhe support NCP Kokate : कोकाटे चौहू बाजूनं संकटात, भाजप मंत्री 'संकटमोचन'च्या भूमिकेत; म्हणाले, 'त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य देणार की नाही?'

BJP Radhakrishna Vikhe Supports NCP Manikrao Kokate in Mahayuti : विधिमंडळात रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मैदानात आले आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar BJP news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओमुळे चांगलेच संकटात सापडला आहे. महायुतीमधील मोजकेच आमदार, नेते आणि मंत्री त्यांच्याविषयी सावध भूमिका घेत आहे.

अहिल्यानगरमधील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री कोकाटे यांची पाठराखण केली आहे. तसंचे महायुतीमध्ये ज्या पक्षाकडून, अशा चुका होत आहे, त्या पक्ष नेतृत्वाने दुरुस्त केल्या पाहिजे, असा सल्ला देखील मंत्री विखे पाटील यांनी दिला.

मंत्री माणिकराव कोकाटे यांची पाठराखण करताना, 'भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना काही व्यक्ती स्वातंत्र्य देणार की नाही? कुणी काय करावे आणि काय नाही? हे कोण ठरवणार? झालेल्या प्रकाराबाबत माणिकराव कोकाटे यांनी स्वतः खुलासा केलाय. मात्र लगेच निष्कर्ष काढून त्यांना आरोपी ठरवणे चुकीचे आहे', असे म्हटले आहे.

'मंत्री कोकाटे (Manikrao Kokate) यांना विधिमंडळात व्हिडिओ काढून कोकाटेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे का? हे शूटिंग नेमकं कुणी केलं? सभागृह सुरू असताना अनेकजण मोबाईलवर बातम्या बघतात. अचानक रमीचा डाव आला याचा अर्थ असा नाही की माणिकराव रमी खेळत होते', असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

'कोकाटे यांनी स्वतःसाठी थोडा वेळ घेतला असेल, तर एव्हढा गदारोळ करण्याची गरज काय? त्यांच्या कृत्यामुळे कुणाची आर्थिक हानी झाली का?', असा प्रश्न मंत्री विखे पाटील यांनी केला आहे.

लातूर इथं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विशाल घाडगेंना राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकारावर मंत्री विखे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्वतः त्या घटनेचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी सुरज चव्हाणचा राजीनामा देखील घेतला आहे. अशा घटनांचे कुणी समर्थन करणार नाही. नेत्यांसमोर प्रामाणिकपणा दाखवण्याच्या नादात अतिउत्साही कार्यकर्ते, असे उद्योग करतात. मात्र अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे नेते आणि पक्ष अडचणीत येतो, असा टोला देखील लगावला.

महायुती बदनामी

'आम्ही महायुती म्हणून काम करतो. ज्या पक्षाकडून चुका होतात, त्या पक्षाच्या नेतृत्वाने दुरुस्त केल्या पाहिजेत. महायुतीवर या गोष्टींचा परिणाम होतो आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. जनादेशाचा आदर केला पाहिजे. घटक पक्षातील लोक, अशा पद्धतीने वागत असतील, तर त्यांना अटकाव केलाच पाहिजे', असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT