Sujay Vikhe On Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe On Congress : 'पृथ्वी'बाबा आले अन् काँग्रेसचा महाराष्ट्रात 'बस्ता' गुंडाळला गेला; सुजय विखेंच्या फटक्यानं काँग्रेस पुरती घायाळ

BJP Sujay Vikhe Blames Prithviraj Chavan for Congress Decline in Maharashtra : महाराष्ट्रातील काँग्रेस पिछेहाट होण्यामागे कारण काय, यावर भाजप माजी खासदार सुजय विखे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया.

Pradeep Pendhare

BJP vs Congress Maharashtra : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पिछेहाट मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना एका वरिष्ठ नेत्याला जबाबदार धरताना पक्ष नेतृत्व देखील तेवढच जबाबदार असल्याचे म्हटलं आहे.

"पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आल्यामुळे जे काही थोडीफार काँग्रेस उरलं होतं, त्याचा पण 'बस्ता' गुंडाळला गेला अन् संपून गेली", असं मोठं विधान भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी केलं आहे.

'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलशी बोलताना भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पिछेहाटवर भाष्य केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निर्णयच घेत नव्हते. परिणामी सत्तेत बरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हाताळण्यात त्यांना जमलं नाही, असा दावा सुजय विखे पाटील यांनी केला.

भाजपचे सुजय विखे पाटील म्हणाले, "काँग्रेसमध्ये (Congress) वरतून लोकं लादली गेली. ती मंत्री असून देखील उपयोग नव्हता. हजारवेळा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसायचं. तरी देखील त्यावर निर्णय होतच नव्हता. पृथ्वीराज चव्हाणसाहेब कधीच निर्णय घेत नव्हते. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचंड त्रास असायचा. कॅबिनेट मंत्री असून, तक्रार करून ऐकत नसायचे".

"पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा अशोकराव चव्हाण यांचा कार्यकाळ चांगला होता. दिवंगत विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ देखील चांगला होता. पण पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव नव्हता, व्यक्ती चांगली आहे. सुशिक्षित आहे. पण दिल्लीसाठी योग्य होती. महाराष्ट्रासाठी नाही", असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीबाबा शंभर टक्के अपयशी ठरले

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आल्यामुळे जे काही थोडफार काँग्रेस उरलं होतं, तो पण 'बस्ता' गुंडाळला गेला अन् संपून गेलं. पृथ्वीराज चव्हाण यांची ती इमेज, मुख्यमंत्री म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसला हाताळयाला, काँग्रेस जिवंत ठेवायला, त्यात ते शंभर टक्के अपयशी ठरले. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस वाढलं, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

गांधी परिवाराला विरोध नाही

पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसला हाताळता आलं नसल्याने आमचं खच्चीकरण झालं. आमचा विरोध राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना नव्हता. गांधी परिवाराला विरोध नव्हता. आजपर्यंत मी वैयक्तिक तरी, गांधी परिवार बोललो नाही. परंतु त्यांनी नेतृत्व म्हणून महाराष्ट्रासाठी निर्णय घेतले, त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागले, असे देखील सुजय विखे पाटलांनी स्पष्ट केले.

राजकारण बदलल्याची नांदी

राष्ट्रवादी काँग्रेसला त्या काळात काँग्रेसला योग्यरित्या हाताळता आले नाही. ते पृथ्वीराज चव्हाण यांना जमले नाही. परिणामी, सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस भारी पडत गेली. जी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसताना काँग्रेसशिवाय बसत नव्हती, ती आता बघा, कोणत्या पद्धतीने सत्तेत सहभागी झाली आहे. राजकारण बदलल्याची ही नांदी आहे, असेहीा सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT