Ravi Rana on NCP : 'सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार'; रवी राणा यांनी महायुतीची रणनीती सांगून टाकली

Amravati MLA Ravi Rana Claims Sharad Pawar and Supriya Sule Will Join Ajit Pawar : अमरावती आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याबरोबरच खासदार सुप्रिया सुळेबाबत मोठा दावा केला आहे.
Ravi Rana on NCP
Ravi Rana on NCPSarkarnama
Published on
Updated on

Amravati MLA Ravi Rana : शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा जोर धरला आहे. शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये 'आय लव यू आहे', असे म्हटले होते.

मंत्री गुलाबराव यांच्या पाठोपाठ महायुतीमधील राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे नेते तथा आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याबरोबरच मोठा दावा केला आहे.

आमदार रवी राणा म्हणाले, "महाराष्ट्रातील राजकारण येणाऱ्या काळात मोठ्याप्रमाणात बदल दिसतील. यात महायुती केंद्रास्थानी असेल. शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे केंद्रीय स्तरावर एकत्र झालेले आहे". उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार दिसतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

पवार कुटुंबियांच्या एकत्रि‍करणाबरोबरच, रवी राणा यांनी खासदार सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री दिसतील, असा दावा केला. पंतप्रधान मोदी यांचे पाहून सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केंद्राला ताकदीने पाठिंबा देतील, असेही आमदार राणा (Ravi Rana) यांनी म्हटले.

Ravi Rana on NCP
Gulabrao Patil on NCP : 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच, दोघांमध्ये 'आय लव यू''; मंत्री गुलाबराव पाटलांची 'स्टाईल'मध्ये प्रतिक्रिया

दोघांमध्ये 'आय लव यू' : मंत्री पाटील

दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली होती. "दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहे. त्यांचा दोघांमध्ये 'आय लव यू' आहे, अशी प्रतिक्रिया देत मंत्री गुलाबराव पाटलांनी खळबळ उडवून दिली.

Ravi Rana on NCP
Supriya Sule Vs Devendra Fadnavis : भेटीगाठीसाठी मला ‘हुडी‘ घालण्याची गरज नाही; सुप्रिया सुळे यांचा CM फडणवीसांना टोला

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी सर्वांसोबतच भेटते. यात अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे". भेटीगाठी घेण्यासाठी मी ‘हुडी‘ वैगरे घालत नाही, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मला ज्यांना भेटायचे आहे त्यांच्याशी दिलखुलास भेटते. फोटो ट्विट करते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com