Sujay Vikhe On Rahul Gandhi : राहुल गांधींनी पवारांकडे पाठवलं अन् राजकीय दिशा बदलली; सुजय विखेंचा गौप्यस्फोट

Bjp Sujay Vikhe Claims Congress Rahul Gandhi Requested 2019 Lok Sabha Ticket from NCP Sharad Pawar : भाजप माजी खासदार सुजय विखे यांनी लोकसभा 2019च्या तिकिटावरून राहुल गांधी आणि शरद पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
Sujay Vikhe And Rahul Gandhi
Sujay Vikhe And Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Sujay Vikhe statement : विखे पाटील परिवाराची राजकीय दिशा कशी बदलली, यावर मोठा गौप्यस्फोट भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलशी बोलताना केला. काँग्रेसकडून खासदारकी लढवायची तयारी होती.

परंतु राहुल गांधी यांनी आम्हाला तिकिटासाठी शरद पवार यांच्याकडे पाठवले. पवारांबरोबर तिकिटावर चर्चा झाली. परंतु तिथं वेगळाच अर्थ काढला गेला. यानंतर वडिल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला राजकीय दिशा बदलावी लागेल, असे सूचविले. यानंतर भाजपमधून खासदारकी लढवली, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला.

देशात 2014मध्ये नरेंद्र मोदी यांच्या रुपाने भाजपची (BJP) लाट आली. केंद्रात सत्तांतर झाले. भाजपच सत्तेत आला. यानंतर 2019च्या निवडणुकीत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना अनेक निर्णय चुकीचे ठरले. त्यातील एक म्हणजे विखे पाटील परिवाराबाबत, झाल्याची किस्सा सुजय विखे पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितला.

सुजय विखे पाटील म्हणाले, "2019 मध्ये राज्यात महाआघाडी होती. राज्याचे विरोधी पक्षनेते वडील राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) होते. महाआघाडीत लोकसभेच्या तिकीट वाटपाची तयारी सुरू होती. या महाआघाडीच्या सर्व बैठका घरी होत होत्या. माझे देखील उमेदवारीसाठी चर्चेत नाव होते. आपल्याला काँग्रेसकडून संधी मिळेल, असे वाटत होते. बैठकांमध्ये नावे निश्चित होत होती. मी जवळपास बसून राहत असे. या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रमुख नेत्यांचं खाणपान होत होतं. बैठकींमधील निर्णयाकडे लक्ष असायचे. इतरांची नाव जाहीर होत होती. मला वाटायचे की आपलं आता नाव येईल, नंतर येईल. पण तसे काही झाले नाही".

Sujay Vikhe And Rahul Gandhi
Ravi Rana on NCP : 'सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार'; रवी राणा यांनी महायुतीची रणनीती सांगून टाकली

परंतु, लोकसभा लढवण्याची तयारी असल्यानं माघार घ्यायचा विषय नव्हता. या बैठकांमध्ये नाव काही जाहीर झालं नाही. शेवटी वडिलांनी राहुल गांधी यांची भेट घेण्याची ठरलं. वडिलांनी तशी दिल्लीत भेट घेतली. राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी राहुल गांधी यांनी ‘घड्याळा’कडे, म्हणजेच शरद पवार यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिल्याचा दावा सुजय विखे पाटलांनी केला.

Sujay Vikhe And Rahul Gandhi
Gulabrao Patil on NCP : 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच, दोघांमध्ये 'आय लव यू''; मंत्री गुलाबराव पाटलांची 'स्टाईल'मध्ये प्रतिक्रिया

राहुल गांधी यांनी थेट शरद पवारांकडे जाण्याचा सल्ला दिल्याने, काही क्षण आम्ही गोंधळात पडलो. पण त्याचवेळी एक विचार, असा आला की, काँग्रेसवर सुरवातीपासून घराणेशाहीचा आरोप होत होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपल्याला शरद पवार यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला असेल, असे समजून आम्ही शरद पवार यांची भेट घेतल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगत गौप्यस्फोट केला.

शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. तिथं जे व्हायचं, ते झालं आणि आम्ही काय समजायचे ते समजलो. आमची काही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी घराण्याविषयी कोणती नाराजी नाही. परंतु वडिलांनी मला आपल्याला दिशा बदलावी लागेल, असे तिथेच सूचक संकेत दिले. त्यानुसार आमचा प्रवास भाजपकडे सुरू झाला, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com