Ahilyanagar Cooperative Bank Chairman Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सभापती प्रा. राम शिंदे अन् खासदार नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळून 'गोंधळी', अशी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती.
यानंतर काल त्यांनी राम शिंदे यांची त्यांच्या गावी जात भेट घेत, बंद दाराआड चर्चा केली. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील-शिंदे यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या (DCC Bank) अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड 12 नोव्हेंबरला आहे. विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेसकडे 17 आणि एक अपक्ष, असे एकूण 18 जणांचे बहुमत असले, तरी त्यात थोरातांचे वर्चस्व आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची त्यांची अचानकपणे चौंडी (ता. जामखेड) येथे जाऊन भेट घेतल्याने ही भेट चर्चेत आली आहे.
भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील बँकेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत. पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. या दोघा नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. त्यानिमित्ताने जिल्ह्याीतल दुष्काळी परिस्थिती, पाणी नियोजन, जामखेडमधील परिस्थिती याबाबत चर्चा झाल्याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राम शिंदे यांनी, जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल बनला होता. त्यात मी नव्हतो. त्यांनी बाळासाहेब थोरातांना जवळ केले होते. स्वपक्षीय असून, मी लांब गेलो होतो. त्यामुळे ताणलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांना भेटावासे वाटले असेल. सहकारात राजकारण नको होते. आम्ही दोघे एकाच पक्षात आहोत. आता ते त्यांच्याबरोबर आहेत, ते भविष्यातील राजकारणासाठी नसतील. आता आम्ही दोघे बरोबर आहोत, अशी त्यांची भूमिका होती, असे स्पष्ट केले.
पालकमंत्री विखे पाटील यांच्याबरोबर असलेल्या निवडून आलेल्या संचालकांना बरोबर लवकरच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मला बोलवले तर मलाही जावे लागेल. मी सहकारात नवीन आहे. सहकारात त्यांनी मला गृहीत धरले नसले. तरी मी दोन संचालक पाठवून माझी ताकद दाखवून दिली आहे, असेही राम शिंदे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.