Ahilyanagar DCC Bank Election : मतपेटीतून निघाली 'गिधाडां'ना धडा शिकवण्याची चिठ्ठी! अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निकालानंतर कारखानदारांविरोधात खळबळ

A handwritten note calling established sugar barons 'vultures' was found during vote counting in the Ahilyanagar DCC Bank election after Nilesh Lanke's victory : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत विखे पाटील-थोरातांच्या सहमती एक्स्प्रेसला आव्हान देत नीलेश लंके विजयी; राम शिंदेंचीही जिल्हा बँकेत एन्ट्री, मतमोजणीवेळी सापडलेल्या चिठ्ठीतून प्रस्थापित कारखानदारांविरोधातील नाराजी उघड
Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar DCC BankSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसाठी बिनविरोध झालेल्या 11 आणि दहा जागांसाठी झालेल्या निवडणूक, खासदार नीलेश लंके यांचा विजय, सभापती प्रा. राम शिंदे यांची जिल्हा बँकेत दोन उमेदवारांच्या माध्यमातून एन्ट्री, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील-काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची सहमती एक्स्प्रेस, सुजय विखे पाटलांनी अध्यक्षपदाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे टोलावलेला चेंडू अन् खासदार लंकेंना विजयाच्या दिलेल्या शुभेच्छांची चर्चा होत असतानाच, मतपेटीतून मतमोजणीवेळी निघालेल्या चिठ्ठीची खुमासदार चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.

या चिठ्ठीतील प्रस्थापित कारखानदारांविरोधात असल्याने खळबळ उडाली आहे. चिठ्ठीत गिधाड हा शब्दाचा प्रयोग झाल्याने, कारखानदारांविरोधात सर्वसामान्य मतदारांमधील रोष या चिठ्ठीच्या निमित्ताने समोर आला आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या (DCC Bank) दहा जागांसाठी काल मतमोजणी झाली. या मतमोजणी दरम्यान, एका मतदान पेटीतून एक चिठ्ठी मिळाली. 'दुष्काळाच्या गोंडस नावाखाली लोकशाहीची हत्या करून घराणेशाहीसाठी आणि सत्तेसाठी एकत्र आलेल्या गिधाडांना धडा शिकवा...', असा मजकूर या चिठ्ठीत लिहिलेला आहे. ही चिठ्ठी हस्ताक्षराने लिहिली आहे. एका मतपत्रिकेला स्टेपल केलेली ही चिठ्ठी होती. मतमोजणी करताना, अधिकाऱ्यांना ही चिठ्ठी सापडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही चिठ्ठी जमा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी या चिठ्ठीवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

परंतु, या चिठ्ठीमुळे आणि त्यातील मजुकराने प्रस्थापित कारखानदारांवर रोष असल्याची चर्चा रंगली आहे. भाजप (BJP) विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी देखील पहिल्यादांच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घातले. प्रस्थापितांविरोधात शेतकरी, कष्टकरी, ठेवीदार, शेतमजुरांसाठी जिल्हा बँकेत उतरले असल्याचे म्हटले होते. खासदार नीलेश लंके यांच्या सहकार परिवर्तन पॅनलने प्रस्थापित कारखानदारांविरोधाच लढा पुकारत आव्हान उभे केले होते.

Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीला खासदार लंके यांचे आव्हान? शरद पवारांच्या भेटीने चर्चा

शरद पवार राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी देखील निवडणुकीला सुरवातीलाच जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांकडे सुमारे 2 हजार 780 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करत, बँकेच्या कर्जवाटपातील मोठा हिस्सा मोजक्या कारखान्यांकडे असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar DCC Bank Election : मंत्री विखे समर्थकाचा करेक्ट कार्यक्रम! नीलेश लंके जिल्हा बँकेत विजयी; सहमती एक्स्प्रेसला मोठा झटका

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विखे पाटील-थोरात एकत्र आले. बिनविरोधाच्या बैठकीत विखे पाटील-थोरात सहमतीत त्यांचे 10 अन् राम शिंदे यांचा एक उमेदवार बिनविरोध झाला. पुढे दहा जागांसाठी निवडणूक झाली. यात कारखानदारीशी संबंध नसलेले खासदार नीलेश लंके, आमदार किरण लहामटे यांनी शड्डू ठोकला होता. यात किरण लहामटे यांचा पराभव झाला. खासदार नीलेश लंके यांनी विजयाचा गुलाल उधळत, कारखानदाराकडे हात-उसने असलेले 200-400 कोटी आणि 2 हजार 780 कोटी रुपयांचे थकीत कर्जाच्या वसुलीवर बोट ठेवले.

थकबाकीदार कारखानदार कोण? अशी चर्चा असतानाच, मतमोजणीवेळी मतपेटीतून कारखानदारांचा गिधाड असा उल्लेख केलेली चिठ्ठी मिळाल्याने, त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कारखानदार ही चिठ्ठी किती गांभीर्याने घेणार? याकडे देखील लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.