Ram Shinde Nilesh Lanke Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर बँकेत विखे-थोरातांची बाजी; राम शिंदे, नीलेश लंके यांच्यासमोर आव्हान!

Ahilyanagar dcc bank election 2026: 11 seats unopposed, 27 candidates contesting 10 seats, with Vikhe-Thorat, Nilesh Lanke and Ram Shinde panels focus : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 11 जागा बिनविरोध; दत्तात्रय पानसरे आणि सचिन घुमरे यांचीही बिनविरोध निवड, उर्वरित 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात.

Pradeep Pendhare

Ahilyanagar district bank election 11 seats unopposed : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडत, भाजपला विधान परिषद निवडणुकीत नडलेले अजित पवार राष्ट्रवादीचे श्रीगोंद्यातील नेते दत्तात्रय पानसरे, अन् भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे जामखेडमधील कट्टर समर्थक सचिन घुमरे यांची बिनविरोध निवड झाली.

याचबरोबर जिल्हा बँकेत 11 जागा बिनविरोध झाल्या. आता दहा जागांसाठी 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, यासाठी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात सहमती एक्सप्रेस, खासदार नीलेश लंके आणि सभापती प्रा. राम शिंदे यांच्या स्वतंत्र पॅनेलमध्ये लढत होणार आहे.

बिनविरोध झालेल्या जागांमध्ये 11 पैकी दहा जागा विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेसला, तर एक जागा सभापती प्रा. राम शिंदे यांना मिळाली आहे. जिल्हा बँकेवर (DCC Bank) विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्सप्रेसचे वर्चस्व दिसत आहे. या सहमती एक्सप्रेसमध्ये थोरातांच्या सहा, तर विखे पाटील यांच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत.

जिल्हा बँकेतील दहा जागांसाठी आता मतदान होत आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले. विखे पाटील-थोरात गटाच्या सहमीत एक्सप्रेस सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना 'कपबशी', शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke)-एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या सहकार परिवर्तन पॅनला 'छत्री', तर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या स्वतंत्र पॅनला 'शिट्टी' चिन्हे मिळाली आहेत.

राम शिंदे यांचे जामखेडमधील उमेदवार सचिन घुमरे यांची बिनविरोध निवड झाल्याने, आता निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार राहिले आहेत. दरम्यान, खासदार लंके आणि माजी खासदार लोखंडे यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे यांची भेट घेत मुदतीनंतर उमेदवारी अर्ज माघे घेतल्याचा आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा आक्षेप फेटाळला. खासदार लंके या मुद्यावरून आक्रमक झाले आहेत. वकील सुरेश लगड यांनी देखील निवडणूक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे.

बिनविरोध झालेले 11 संचालक

सोसायटी मतदार संघ ः जामखेड - सचिन घुमरे (प्रा. शिंदे गट), अहिल्यानगर तालुका - आ. अक्षय कर्डिले (विखे गट), कोपरगाव- बिपीन कोल्हे (थोरात गट), नेवासा- माजी मंत्री शंकरराव गडाख (थोरात गट), पाथर्डी- आ. मोनिकाताई राजळे (थोरात गट), राहाता - माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (विखे गट), संगमनेर - रणजितसिंह देशमुख (थोरात गट), शेवगाव- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले (थोरात गट), श्रीरामपूर- नगराध्यक्ष करण ससाणे (थोरात गट) व श्रीगोंदे- दत्ता पानसरे (विखे गट). बिगर शेती संस्था मतदार संघ ः सचिन जगताप (विखे गट)

यांच्यात होणार आता लढती

सोसायटी मतदार संघ ः अकोले - आ. डॉ. किरण लहामटे व संजीवनी शिंदे, कर्जत - तुषार पिसाळ व ज्योती शिंदे, पारनेर- खा. निलेश लंके व राहुल शिंदे, राहुरी- आ. प्राजक्त तनपुरे व सत्यजित कदम. शेतीपूरक मतदार संघ - आ. आशुतोष काळे व सुधीर म्हस्के. महिला राखीव (दोन जागा) मतदार संघ- हर्षदा काकडे, पुष्पा गायकवाड, मंजुषा गुंड, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, संध्या महांडुळे व संगीता वाघ. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ- माजी आमदार वैभव पिचड व प्रशांत लोखंडे. इतर मागासर्व-ओबीसी मतदार संघ - शिवदास गुंजाळ, कारभारी जावळे, जालिंदर वाकचौरे, कडूचंद शेटे व आजिनाथ हजारे. भटके विमुक्त मतदार संघ- सुभाष गिते, ऋषिकेश ढाकणे व गणपतराव सांगळे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT