Ram Shinde and Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदे अन् नीलेश लंकेंची बंद दाराआड चर्चा; अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत काय घडणार?

Ram Shinde and Nilesh Lanke meet amid political discussions over Ahilyanagar District Bank election, unopposed polls and possible third option : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांची भेट; बिनविरोध निवडणूक, तिसरा पर्याय आणि संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चा. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवसाकडे लक्ष.

Pradeep Pendhare

Ram Shinde Nilesh Lanke closed door meeting : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी भेट घेत, बंद दाराआड चर्चा केली.

या भेटीचा तपशील समोर आला नसला, तरी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बिनविरोधासाठी की, राजकीय बळ देण्यासाठी की, तिसरा पर्याय उभा करण्यासाठी, अशा अनेक चर्चांना या दोघांभोवती उधाण आले आहे. पण या सर्वांवरचा पडदा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच बुधवारी 21 तारखेचलाच स्पष्ट होईल.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी नाराजांना बरोबर घेत, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत नीलेश लंके यांनी आपला वस्ताद आपल्याबरोबर आहे, असे सूचकपणे जिल्ह्यातील सहकार दिग्गजांना सांगितले होते. या भेटीनंतर आता नीलेश लंके थेट राम शिंदे यांची भेट घेताना दिसले. या दोघांच्या भेटीत नेमके काय झाले, यासह अनेक प्रश्न त्यांच्याभोवती चर्चेत आली आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (DCC Bank) पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, असे प्रस्ताव मांडण्यात आला होता. या बैठकीला कट्टर विरोधक एकत्र आले होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.

भाजप विधान परिषदेचे प्रा. राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांनी हजेरी लावली नव्हती. राम शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे म्हटले आहे. परंतु नीलेश लंके यांनी बँकेसाठी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. शरद पवार यांची नाराजांना बरोबर घेऊन भेट घेतली आहे.

या भेटीनंतर नीलेश लंके थेट राम शिंदे यांच्या भेटीला दिसले आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट, बंद दाराआडची झालेली चर्चा, चर्चेत आली आहे. नीलेश लंके तिसरा पर्याय देण्याच्या तयारी असल्याचे सांगितले जाते. त्याल राम शिंदे बळ देणार की, बिनविरोधसाठी लंकेंना गळ घातली, हे सर्व चित्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होईल.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवर प्रतिस्पर्धी एकनाथ घोगरे यांनी याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमवारी निर्णय येणे अपेक्षित आहे. दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी, जिल्हा बँकेसाठी आपला पॅनल निश्चित केला असल्याची चर्चा आहे. यातूनच खासदार लंके यांनी तिसरा पर्याय उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे दिसते. त्यामुळे राम शिंदे यांची घेतलेली भेट चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT