Ahilyanagar district development meeting : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा समिती) सभेत खासदार नीलेश लंके यांनी राजीनाम्याच्या विधानाने आणि जलजीवन मिशन योजनेतील गैरव्यवहाराच्या मुद्याने गाजली.
शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. या योजनेत केंद्र सरकारपुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी या समितीच्या सभेत जलजीवन मिशन योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चौकशी समितीच्या नियुक्तीची मागणी केली. 210 योजना पूर्ण झालेल्या दाखवल्यास मी राजीनामा देतो, नाही तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्रीरंग गडदे यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान दिले.
जलजीवन मिशन योजनेतील सर्वांत मोठा घोटाळे झाले आहेत. मी केंद्र सरकारकडे (Central Government) पाठपुरावा करून केंद्रीय समितीच चौकशी लावली. मात्र समितीला पैसे देऊन गोलमाल करण्यात आले. कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. पाथर्डीच्या उपअभियंत्याने या समितीलाच अरेरावीची भाषा वापरली. बदली झाली असतानाही उपअभियंता गडदे सूत्रे सोडत नाहीत. कार्यकारी अभियंता रजेवर पाठवून 27 कोटी रुपयांची देयके काढली गेली, आरोप खासदार लंके यांनी म्हटले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे (Shivsena) खासदार वाकचौरे यांनी देखील धामणगाव आवारी इथं योजनेत 10 कोटी रुपये खर्च झाला, पण पाणी मिळाले नाही, अशी तक्रार केली. जलजीवन मिशन योजना केवळ अधिकारी व ठेकेदारांनी खाऊन टाकली आहे. एका ठेकेदाराकडे 32 योजनांची कामे आहेत, असा दावा खासदार वाकचौरे यांनी केला.
या समितीच्या सभेत कृषी, महावितरण, शिक्षण विभागाच्या कारभाराबद्दल खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार नीलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केली. माध्यमिक शिक्षण विभाग म्हणजे गरिबांना छळणारा विभाग आहे, असा गंभीर आरोप खासदार वाकचौरे यांनी केला.
अहिल्यानगर शहरताील फेज-२ पाणी योजना ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही, 15 वर्षांपासून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या योजनेची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करावी, असे पत्र खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच अमृत भुयारी गटार योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. महापालिका आयुक्त नागरिकांना मोबाईलद्वारे पुढाऱ्यांचे नाव घेऊन धमकीचा संदेश पाठवत आहे. नेत्यांचा दबाव टाकत आहेत, याबद्दलही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.