Uddhav Thackeray: दाढीवरुन हात फिरवणाऱ्यांची लोक बिन पाण्याची करतील; ठाकरे ब्रॅण्ड संपवण्याची प्रयत्न करणारे बाहेर बँण्ड वाजवीत फिरताहेत!

Maharashtra Politics Uddhav Thackeray Targets Eknath Shinde: "साचलेल्या डबक्याला थोडा आऊटलेट द्यावा लागतो, असे दिवटे बाहेर गेलेले बरेच, आमच्याकडून त्यांच्याकडे गेले त्यांनी तिथं काय दिवे लावले,"
Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Uddhav-Thackeray-Eknath-ShindeSarkarnama
Published on
Updated on

✅ ३ महत्वाचे मुद्दे

  1. एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरे यांचा हल्ला'सामना' मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर टोला लगावत म्हटले की "ठाकरे ब्रँड" संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता नाकारेल.

  2. शिवसेनेतील फुटीवर मत: पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना त्यांनी 'साचलेल्या डबक्यातून बाहेर गेलेले दिवटे' असे संबोधले आणि त्यांचा काही उपयोग झाला नाही असे म्हटले.

  3. निवडणूक आयोगावर टीका: ठाकरे यांनी आयोगाला 'धोंड्या' म्हटले आणि शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्याला देण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे स्पष्ट केले.

"ठाकरे ब्रॅण्ड संपवण्याची प्रयत्न करणारे बाहेर बँण्ड वाजवीत फिरत आहेत. पक्ष चोरुन स्वत:चे महत्व वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना हे नाव दुसऱ्याला देता येणार नाही. कुणीही शिवसेना संपवू शकत नाही, दाढीवरुन हात फिरवणाऱ्यांची लोक बिन पाण्याची करतील," अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी शिंदेंना कानपिचक्या दिल्या. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना ठाकरे यांच्या निशाण्यावर सत्ताधारी होते. अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिलीत.

एकनाथ शिंदे म्हणतात मी अर्ध्या दाढीवरुन हात फिरवला तर काय होते, हे तुम्ही पाहिले, पूर्ण दाढीवरुन हात फिरवला तर काय होईल, असा इशारा शिंदे यांनी दिला होता. यावर राऊतांनी विचारलेल्या प्रश्नावर ठाकरेंनी शिंदेंवर घणाघात केला.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Maharashtra Politics: वाचाळ नेते अन् खालावलेले राजकारण; घसरलेल्या संवादात जनतेचे हरवलेले प्रश्न, हीच महाराष्ट्राची ओळख?

शिवसेनेला, तुम्हाला सोडून अनेक जण गेले, या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "साचलेल्या डबक्याला थोडा आऊटलेट द्यावा लागतो, असे दिवटे बाहेर गेलेले बरेच, आमच्याकडून त्यांच्याकडे गेले त्यांनी तिथं काय दिवे लावले," ‘ठाकरे ब्रॅण्ड ’ संपवण्यासाठी बाहेर काही जण बॅण्ड वाजत आहेत. त्या बॅण्डवाल्यांचा बॅण्ड महाराष्ट्राची जनता वाजवेल, असा टोला ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

अनेक आले, अनेक गेले....

उद्धव ठाकरे म्हणाले, "ठाकरे हा नुसता ब्रँड नाही. हा ब्रँड म्हणजे महाराष्ट्राची, मराठी माणसाची, हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न काहींनी केला. पुसू इच्छिणारे पुसले गेले. अनेक आले, अनेक गेले. जनतेने त्यांना पुसून टाकले,"

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Kolhapur Politics: 'सोन्याचे गाव' लोकनियुक्त सरपंचाला ग्रामस्थांनी दाखवला घरचा रस्ता..

निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचे या विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे. यावर ठाकरे म्हणाले, "निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’ असून या धोंड्यास शेंदूर फासला तरी ‘शिवसेना’ हे नाव व धनुष्यबाण चिन्ह दुसऱया कोणाला देण्याचा अधिकार या धोंड्याला नाही,"

लोकांनी विचारलेले प्रश्न

प्र1: एकनाथ शिंदेंच्या ‘दाढी’ वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ते म्हणाले की दाढीवरून हात फिरवणाऱ्यांना जनता बिनपाण्याची करेल.

प्र2: शिवसेनेचं नाव व चिन्हाबाबत ठाकरे यांचं मत काय आहे?
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण कोणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही.

प्र3: पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल ठाकरे काय म्हणाले?
ते साचलेल्या डबक्यातून बाहेर गेलेले दिवटे असून त्यांचा फार उपयोग झाला नाही.

प्र4: 'ठाकरे ब्रँड' म्हणजे काय?
तो महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदू अस्मितेची ओळख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com