Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची मला गरजच काय? खासदार लंकें विरोधकांना टोला

Ahilyanagar Nagar South Lok Sabha Constituency NCP SharadChandra Pawar Party MP Nilesh Lanke Parner : पारनेर बसस्थानक इमारतीच्या 2 कोटी 66 लाख रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : खासदार नीलेश लंके यांच्या पारनेरमधील बसस्थानक इमारतीच्या कामावरून श्रेयवाद रंगण्याची चिन्हं आहेत. पारनेर बसस्थानकाच्या इमारतीसाठी 2020 पासून तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू होता.

असे असताना विरोधक म्हणतात की, आमच्य कामाचे श्रेय घेऊ नका. जे काम मी आणले, त्याचे भूमिपूजन मीच करणार ना! दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची मला गरजच काय?, असा सवाल करीत खासदार नीलेश लंके‌ यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.

खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी आमदार म्हणून सकारात्मक काम केले. त्यामुळेच हजारो कोटी रूपयांची विकासकामे मार्गी लावता आली. त्यामुळेच तालुका विकासात अग्रेसर असल्याचे चित्र आहे. मतदारसंघात मी प्रामाणिक काम केले म्हणूनच मतदारांनी मला लोकसभेत पाठविल्याचे खासदार लंके यांनी म्हटले. पारनेर बसस्थानक इमारतीच्या 2 कोटी 66 लाख रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. संभाजी रोहोकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे उपस्थित होते.

विधानसभेचा निकाल कसा लागला आहे, हे सर्वांना माहिती आहे. पूर्वी राजकीय लोक 'ईव्हीएम'वर (EVM) संशय घेत होते. आज शेतामधील भगिनीही 'ईव्हीएम'वर अविश्वास व्यक्त करत आहे. राज्यात सरकार आल्यावर वेगळा उत्साह असतो, तो दिसला का? असा प्रश्न उपस्थित करत 'ईव्हीएम'च्या जोरावरील विजय टिकणार नाही. ज्यांनी निवडणूक सोडली त्यांच्या तोंडात या निवडणुकीत जांभूळ पडल्याचे सांगत खासदार लंके यांनी निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले.

खासदार लंके यांनी आंबेडकर भवनासाठी आम्ही अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. मात्र त्यात काहींनी खोडा घातला. सूर्य तळहाताने झाकता येत नाही, असे सांगतानाच सत्ता सर्वसामान्यांसाठी भूमिका असली पाहिजे असे सांगितले.

मला दिल्ली मिरवायला पाठविले नाही !

कांदा, दूध शेतमालाच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. दूध प्रश्नावर आवाज उठवला. सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी दिल्लीत मंत्र्यांना पत्र दिले आहे. सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर या प्रश्नावर संसदेच्या पायरीवर आंदोलन करणार आहे. मुदतवाढ झाली नाही, तर मलाच तुरूंगात डांबा, अशी भूमिका मी घेणार आहे. मला तुम्ही दिल्ली मिरवायला नाही पाठवले, तुमचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवल्याचे खासदार लंके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT