Ahilyanagar Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Election Results 2024 LIVE Counting : 'मविआ'चे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात पिछाडीवर; खेम्यात भयाण शांतता

MVA Balasaheb Thorat Shankarrao Gadakh Prajakt Tanpure Rani Lanke Anuradha Nagawade : अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात, साडेअकरा वाजेपर्यंत पिछाडीवर पडल्याने धाकधूक वाढली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Election Results : अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात धक्का बसताना दिसतोय. पहिल्या आठ आणि दहा फेऱ्यांपर्यंत महाविकास आघाडीचे नेते पिछाडीवर होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या खेम्यात चिंता वाढलेली आहे.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरवात झाली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडी पिछाडीवर पडलेली दिसते. संगमनेर मतदारसंघातील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात तब्बल 11 हजार मतांनी पिछाडीवर होते. नेवासा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख देखील पिछाडीवर पडलेले दिसतात. श्रीगोंदा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनुराधा नागवडे या देखील पिछाडीवर आहेत.

राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर आहे. या लढतीत रोहित पवार सुरवातीला आघाडीवर होते. परंतु मतपेट्या फुटल्यानंतर आणि दुसऱ्या फेरीनंतर भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने आघाडी घेतली आहे. रोहित पवार पिछाडीवर पडले आहेत. हा कल पुढे बदलेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सातव्या फेरीअखेर रोहित पवार यांनी राम शिंदे यांना 566 मतांनी पिछाडीवर पडले होते.

राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात देखील जोरदार टक्कर सुरू असून, तिथं आठव्या फेरीपर्यंत शिवाजी कर्डिले 132 मतांनी पुढे होते. श्रीरामपूरमध्ये मात्र कल बदलला असून, तिथं बंडखोर उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आघाडीवर होते. तिथे आता काँग्रेसचे हेमंत ओगलेंनी सात हजार मतांची आघाडी घेतली आहे. पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी उमेदवार राणी लंके देखील पिछाडीवर आहेत.

शिर्डीत पहिल्या फेरीपासून भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पहिल्यापासून आघाडीवर आहेत. अहिल्यानगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप देखील पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्य कोपरगाव मतदारसंघातील आमदार आशुतोष काळे यांनी सातव्या फेरीपर्यंत 61 हजार 742 घेतले होते. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आघाडीवर होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघापैकी 09 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार आघाडीवर होते. महाविकास आघाडीचे उमेदवार पिछेहाट झाल्याने मविआच्या खेम्यात शांतता पसरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT