Saraf Bazaar robbery Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saraf Bazaar robbery : सराफ बाजारात खळबळ; दोन किलो सोनं सहा कारागिरांनी चोरलं

Ahilyanagar Saraf Bazaar Robbery Six Workers Steal 1 Crore Gold from Goldsmiths : अहिल्यानगर सराफ बाजारातून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने घेऊन सहा कारागिर पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar crime news : अहिल्यानगरच्या सराफ बाजार खळबळ घडवणारी घटना घडली आहे. सराफांकडे काम करणाऱ्या सहा कारागिरांनी आठ सराफांचे तब्बल एक कोटीहून अधिक किंमतीचे दोन किलो वजनाचे शुद्ध सोन चोरी करून पसार झाले आहेत.

या कारागिरांबरोबर दोन महिला, तीन अल्पवयीन मुले, असे एकूण 13 जण सध्या सराफ बाजारातून पसार झालेले आहे. या चोरीच्या चौकशीसाठी कोतवाली पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. या चोरीमुळे अहिल्यानगरच्या सराफ बाजारा खळबळ उडाली आहे. दिवाळी काळातच अशी चोरी झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सराफ कृष्णा जगदीश देडगावकर (वय 32, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी रस्ता, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलिस (Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे. कोतवाली पोलिसांनी सहा संशयित कारागिरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा, स्नेहा बेरा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा संशयित कारागिरांची नावे आहेत.

फिर्यादी कृष्णा देडगावकर आणि त्यांचा भाऊ प्रतिक देडगावकर यांचे देडगावकर ज्वेलर्स नावाने सराफ (Gold) बाजारात दुकान आहे. दुकानाच्या तळमजल्यावर कारागिर दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सत्तू बेरा, स्नेहा बेरा हे दागिने बनवण्याचे काम करत होते. तसेच सोमनाथ सामंता आणि आन्मेश दुलोई हे दुकानासमोरील दुसरे सोनार विजय जगदाळे यांच्या दुकानाच्या ठिकाणी कारागिर म्हणून काम करत होते.

रविवारी (26 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी कृष्णा देडगावकर तळमजल्यावर गेले असता कारागिर दिपनकर माजी जागेवर नव्हता. फोन करून विचारणा केली असता तो दहा मिनिटांत येतो असे म्हणाला. परंतु बराच वेळ उलटूनही तो आला नाही आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागला.

इतर कारागिरांचे मोबाईलही बंद मिळाल्याने संशय निर्माण झाला. फिर्यादी यांनी संबंधित कारागीरांच्या घरी जाऊन चौकशी केली असता घरे बंद होती. कुलूप लावलेली होती. कारागिर सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची खात्री पटल्यानंतर सराफांनी कोतवाली पोलिसांकडे धाव घेतली. कोतवाली पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीत, सराफांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य आठवले.

आठ सराफांचे दागिने

कारागिरांबरोबर त्यांच्याबरोबर असलेल्या दोन महिला आणि तीन अल्पवयीन मुले देखील पसार झाली आहेत. या चोरीत एकूण 2 किलो 21 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. त्याची एकूण किंमत 1 कोटी 1 लाख 5 हजार रूपये इतकी आहे. चोरी गेलेल्या सोन्यात कृष्णा देडगावकर, प्रतीक देडगावकर, विजय जगदाळे, सागर गुरव, भरत शिराळकर, बरजहान शेख, प्रमोद गाडगे, आणि इम्रान अली या सराफांच्या दागिन्यांचा समावेश आहेत.

कारागिरांचा शोध सुरू

कारागिर पसार झाल्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले आहेत. हे कारगिर सराफांकडे गेल्या काही वर्षांपासून काम करतात. सराफांचा व्यावसायिकांचा विश्‍वास संपादन करून लबाडीने ही चोरी केली. या कारागिरांचे पूर्ण पत्ते उपलब्ध नाही. त्यांचे मोबाईल बंद येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT