Bachchu Kadu On Prakash Ambedkar : 'आमच्याकडून काही चुकलं असेल, तर कान पकडावा'; बच्चू कडू असं का म्हणाले...

Bacchu Kadu Reacts from Wardha to Prakash Ambedkar Criticism in Nanded Maharashtra Politics News : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टिकेला बच्चू कडू यांनी खुबीनं उत्तर दिलं आहे.
Bacchu Kadu On Prakash Ambedkar
Bacchu Kadu On Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics update : 'प्रहार'चे बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चावर 'वंचित बहुजन आघाडी'चे प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली. यावर बच्चू कडू यांनी अतिशय संयमाने उत्तर देत, आमच्याकडून काही चुकलं असेल, तर कान पकडावा, असं म्हटलं आहे.

तसंच प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी प्रचंड आदर आहे आणि करतो, पण त्यांच्याकडून ही अपेक्ष नव्हती, असा देखील टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

'वंचित'चे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नांदेड इथं पत्रकार परिषदेत, बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चावर टीका केली. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी छातीवर गोळ्या झेलण्याची भाषा केली होती. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, "लय वल्गना बघितल्या आहेत, त्यामुळे लोकांनी आता फसू नये, मंत्रिपद असताना काय झक मारत होता का?", असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानावर, प्रतिक्रिया देताना म्हटले, "प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो, त्यांच्याकडून या अपेक्षा नाहीत. आमच्याकडून काही चुकलं असेल, तर कान पकडावा. परंतु मी मंत्री असताना दुचाकीने शेतकऱ्यांच्या आंदोलनात शामिल झालो होतो, हे प्रकाश भाऊंना माहित नसेल."

Bacchu Kadu On Prakash Ambedkar
Bihar assembly election : राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला सहा, तर काँग्रेस दहा ठिकाणी उमेदवारच नाही

बच्चू कडू म्हणाले, "प्रकाश आंबेडकर यांचं विधान नेमकं कोणाच्या बाजूने आहे, हे समजत नाही. शेतकऱ्यांच्या बाजूने की कोणाच्या बाजूने याच स्पष्ट होत नाही." आम्ही तुमचं आदर करतोय, तुम्ही परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहे, तुम्हाला आम्ही काही बोलू आम्ही एवढे मोठे नाही, असेही कडू यांनी म्हटले.

Bacchu Kadu On Prakash Ambedkar
ZP Election Delay : झेडपी निवडणुकीला विलंब? पक्षांतर करणाऱ्यांचे राजकीय समीकरण बिघडणार

'आमच्या आंदोलनाबद्दल, हा मोर्चा शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांचं आहे. माझ्याबद्दल व्यक्तिगत राग असेल, तर मला घरी बोलवून कान पकडावा. इथं जर तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं बोलल्याने वाईट होत असेल, तर हे बरोबर नाही. हे चुकीचं होईल. तुमचं आम्ही आदर करतो, तुम्ही स्वतः शामील झालं पाहिजे, समर्थन दिलं पाहिजे, शेतकऱ्यांची लढाईसोबत लढली पाहिजे,' असेही बच्चू कडू यांनी म्हटलं.

बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात दाखल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्या घेत, बच्चू कडूंनी नागपूरमध्ये महा एल्गार मोर्चा काढलेला आहे. हा महाएल्गार मोर्चा नागपुरात दाखल होताच, नागपूरच्या बुटीबोरी परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. नागपूर-वर्धा महामार्ग पूर्णतः जाम झालेला आहे. वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शेकडो ट्रॅक्टर, चार चाकी वाहनं आणि मालवाहू वाहने घेऊन मोर्चासाठी राज्यभरातून शेतकरी व प्रहार कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com