Karjat municipal politics : कर्जत नगरपंचायतीमधील सत्तांतर नाट्यामागे भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे असल्याचे समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील बंडखोरी नगरसेवकांसमवेत, त्यांचा मुंबईमधील फोटो समोर आला आहे. तिथं पत्रकार झाली.
पण आता, या बंडखोरांमध्येच नगराध्यक्ष कोण होणार? यावरून कुरघोड्या सुरू झाल्याचे समजते. काँग्रेसच्या रोहिणी घुले आणि राष्ट्रवादीच्या छाया शेलार, यांची नावं आघाडीवर आहे. सहाजिकच, या सर्व घडामोडीत प्रा. राम शिंदेंचा शब्द अंतिम राहणार असून, ते कोणत्या पारड्यात वजन टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार गटाची सत्ता आहे. काँग्रेसला बरोबर घेत आमदार पवार यांनी 17 जागांपैकी 15 जागा जिंकल्या. यात 12 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. यातील आठ नगरसेवक आता फुटले आहे. त्यांना काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची साथ मिळाली आहे. भाजपच्या दोन नगरसेवकांना बराबेर घेऊन, विद्यमान नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वासचा ठराव दाखल केला आहे.
या राजकीय घडामोडीनंतर नगराध्यक्ष उषा राऊत यांनी राजीनामा दिला आहे. सहाजिक, राजकीय बळाशिवाय कर्जत नगरपंचायतीत एवढी मोठी उलथापालथ होणार नाही. भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) या राजकीय नाट्यामागे होते. परंतु ते समोर येत नव्हते. बैठका होत होत्या. पण, त्या गोपनीय होत होत्या. मात्र प्रा. राम शिंदे आता समोर आले आहे. मुंबई इथं बंडखोर नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. राम शिंदे मध्यभागी बसले होते. आता हा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
कर्जत नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपला राजीनामा आमदार रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आता बंडखोरांमधून नगराध्यक्षाच्या कुर्चीवर कोण विराजमान होणार, याची चर्चा आहे. काँग्रेसच्या रोहिणी घुले आणि राष्ट्रवादीच्या छाया शेलार, यांची नावं चर्चेत आहेत.
काँग्रेसच्या रोहिणी घुले या भाजपचे स्थानिक नेते आणि बंडामागील किंगमेकर प्रवीण घुले यांच्या भावजयी आहेत. त्यामुळे अविश्वास ठरावानंतर पुढील पदाधिकारी निवडीत त्यांचे पारडे जड वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील सुनील शेलार यांच्या मनात अनेक दिवसांपासून नगरपंचायत कारभारावरून असंतोष खदखदत होता. या बंडाळीत ते देखील आक्रमक होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी छाया शेलार यांचे नाव देखील आघाडीवर राहू शकते. कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला गटाकडे आहे. त्यामुळे बंडखोरांमध्ये नगराध्यक्षपदावरून कुरघोड्या रंगू लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.