AMC general body meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

AMC general body meeting : महासभा तहकूब होण्यामागे मोठी खदखद! सत्ताधारी राष्ट्रवादी-भाजप नगरसेवकांमध्ये 'तू तू-मैं मैं'; ठाकरेंच्या शिलेदारानं 'इनसाइड स्टोरी' आणली समोर

ShivSenaUBT Kiran Kale claimed that Ahilyanagar Municipal Corporation general body meeting cancelled due dispute over shop allocation between BJP and Ajit Pawar NCP ruling corporators : अहिल्यानगर महापालिकेतील अजित पवार राष्ट्रवादी-भाजप सत्ताधाऱ्यांनी आज बोलवलेली महासभा रद्दमागील स्टोरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे किरण काळे यांनी सांगितली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची आजची होणारी महासभा, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी पाठ फिरवल्याने तहकूब झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शहरात असतानाच एवढी मोठी घडामोडी झाल्याने, राजकीय चर्चांना पेव फुटलं आहे. दरम्यान, ही महासभा तहकूब होण्यामागील इनसाइट स्टोरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी समोर आणत घणाघात केला आहे.

सुमारे 114 कोटींच्या कर्जावर उभारण्यात येणाऱ्या नियोजित पाच व्यापारी संकुलांतील कमर्शियल गाळ्यांच्या वाटपाचा मलिदा कोणी किती खायचा यावरून सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी-भाजप नगरसेवकांत तू तू-मैं मैं झाल्यामुळे सभा स्थगित करण्याची नामुष्की ओढवली, असा दावा शिवसेना ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे.

किरण काळे यांनी आपला दाव्याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, महापालिकेत अजित पवार राष्ट्रवादी-भाजप, या दोघांची सत्ता असली, तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सबकुछ आहे. राष्ट्रवादीचे (NCP) स्थानिक नेतृत्व भाजपला कवडीची ही किंमत देत नाही. पालकमंत्री ज्येष्ठ व अनुभवी नेते असून देखील त्यांचाही मान राखला जात नाही. भविष्यात भाजपने राष्ट्रवादीला बाजूला करून अन्य घटकांना बरोबर घेत, सत्ता स्थापन केली तर आश्चर्य वाटू नये, असा खळबळजनक दावा केला आहे.

आयुक्त यशवंत डांगे यांनी लग्नसराई मुळे सभा रद्द झाल्याचा खुलासा केला. तो धादांत खोटा असल्याचे म्हणत, गुरूवारी रात्री उशिरा सावेडीत एका भाजप (BJP) पदाधिकाऱ्याच्या घरी शहरातील सत्ताधारी नगरसेवकांची अनौपचारिक बैठक झाली. दोन्ही पक्षांचे प्रमुख नगरसेवक या वेळी उपस्थित होते. पाच व्यापारी संकुलांमध्ये मिळून लाखो स्क्वेअर फुटचे कमर्शियल गाळे कर्ज घेऊन बांधण्याचा घाट सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र हे गाळे बांधण्यापूर्वीच भाजपच्या नगरसेवकांना राष्ट्रवादी पेक्षा जास्त गाळ्यांची मागणी केल्याने वादाला तोंड फुटल्याचे किरण काळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार राष्ट्रवादीकडून भाजपची ही मागणी फेटाळून लावण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधी आमचा असल्यामुळे आम्हाला जास्त गाळे हवेत, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. यावरून त्या बैठकीत जोरदार वादंग झालं. दोन्ही गटाचे नगरसेवक एकमेकांवर अक्षरशः धावून गेले. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही एक देणं-घेणं नसून निवडणूक काळात मतं विकत घेण्यासाठी वाटलेले कोट्यवधींची वसुली, या पाच वर्षांत शहराला कर्जाच्या खाईत लुटून करायचे आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचा आटापिटा सुरू असल्याचा गंभीर आरोप, किरण काळे यांनी केला आहे.

...तर भाजपने सत्तेला लाथ मारावी

सभेची विषय पत्रिका ठरवताना भाजपला विचारात घेतल जात नाही. पालकमंत्री व माजी खासदारांनी केलेल्या सूचनांना अजित पवार राष्ट्रवादी केराची टोपली दाखवते. विकास कामांच्या टेंडरचा मलिदा केवळ राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना मिळतो. भाजप नेतृत्वाचा मान राष्ट्रवादी ठेवत नाही. भाजपचे नेतृत्व अनुभवी, मोठे आणि राज्य पातळीवरील आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील आहे. स्वाभिमान गहाण ठेवावा लागत असेल, वारंवार अवमान होत असेल, तर भाजपने अशा सत्तेला लाथ मारावी, असा सल्ला शिवसेना ठाकरे सनेच्यावतीने किरण काळे यांनी दिला.

"अर्थ"पूर्ण विषयांनाच प्राधान्य का?

पंपिंग स्टेशन सावेडी ते कल्याण रोड अमरधामपर्यंत तीस मीटर रुंदीच्या रिंग रोड करिता बाधित होणाऱ्या जमिनीचे भूसंपादन, केडगावच्या सर्वे नंबर 208 मधील जागेचे रस्त्यासाठी भूसंपादन करणे, यापूर्वी निकृष्ट झालेल्या कामांच्या अनमत रकमा परत करणे, बँकांकडून शेकडो कोटींची कर्ज काढणे आदी विषय सभेच्या विषय पत्रिकेवर होते. यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये लागणार आहेत. मनपा तिजोरीत खडाखडात असताना जनहिताचे प्रश्न सोडून सत्ताधाऱ्यांचे केवळ "अर्थ"पूर्ण हितसंबंध जोपासणाऱ्या विषयांनाच प्राधान्य का दिले जाते? असा सवाल किरण काळे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT