Ahilyanagar road scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar municipal corporation scam : ठाकरेंच्या शिलेदाराचं 'टायमिंग'; मनपा रस्ते घोटाळा आता न्यायालयात गाजणार! किरण काळेंची जनहित याचिका

Ahilyanagar Road Scam Shiv Sena UBT Kiran Kale Files PIL in Bombay High Court Aurangabad : अहिल्यानगर महापालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात पाठपुरावा करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar road scam : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी निवडणुकीच्या तयारीत आहेत. बैठकांचा जोर चालू असताना, विरोधकांना कशी धोबीपछाड द्यायची याच्या रणनीती सुरू आहेत. अहिल्यानगर महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी महायुती अन् महाविकास आघाडी घमासान होण्याची चिन्हं आताच दिसू लागली आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक गाजणारा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या हाती लागला आहे. शहरातील 778 रस्त्यांच्या कामंच्या दर्जा तपासणारे गुणवत्ता अहवाल बनावट टेस्ट रिपोर्टचा! शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळेंनी यांनी यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. जनहित याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिलेदारानं हे टायमिंग साधल्यानं महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढणार असल्याची चिन्हं आहेत.

अहिल्यानगर मनपा हद्दीतील 778 रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा तपासणारे गुणवत्ता अहवाल बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करून कोट्यवधींची बिले लाटत घोटाळा केल्याची तक्रार शिवसेनेचे (Shivsena) शहर प्रमुख किरण काळे सन 2023 पासून प्रशासन, सरकारकडे करत आहेत. मात्र त्याची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे, अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठामध्ये घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी जनहित याचिका (पीआयएल) दाखल केल्याची, माहिती काळे यांनी दिली आहे.

दरम्यान, याच घोटाळ्याची चौकशीसाठी मध्यंतरी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले होते. या पत्रावरून बराच गदारोळ झाला होता. आता किरण काळे यांनी जनहित याचिका दाखल करत महाराष्ट्र शासन आणि इतर, अशी प्रतिवादी केली आहेत. ही याचिका त्यांनी 22 सप्टेंबर 2025 खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील दोषींचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.

किरण काळे म्हणाले, "ही जनहित याचिका तांत्रिकदृष्ट्या मी दाखल केली असली, तरी ती या शहरातील लाखो सर्वसामान्य नागरिकांच्यावतीने दाखल केलेली आहे. या लढाईत मी एकटा नसून कोट्यवधी रूपयांचा कर भरणारे नगरकर रस्त्यांसाठी लढत आहे."

गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन; पण...

काळे यांनी मे 2023 पासून 14 जुलै 2025 पर्यंत सर्व स्तरावर लेखी तक्रारी केल्या. आंदोलने केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी तोफखाना पोलिसांनी काळे यांना आंदोलना पूर्वीच ताब्यात घेतले. मनपा आयुक्तांच्या मान्यतेने उपायुक्त, शहर अभियंता यांनी पोलिस निरीक्षकांच्या दानात 31 मे 2023 रोजी काळे यांच्याशी चर्चा करत दीड महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन देखील दिले. मात्र त्याची पूर्तता झाली नाही.

नांगरे पाटलांकडे तक्रार; पण...

काळे यांनी अँटी करप्शनचे पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे धाव घेत 28 नोव्हेंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली. ढीगभर पुरावे सादर केले. तक्रारीचा पाठपुरावा केला. त्यानंतर तब्बल एक वर्षाने 7 ऑक्टोबर 2024 रोजी अहिल्यानगर अँटी करप्शनने काळेंचा जबाब नोंदवला. मात्र त्यानंतर हे प्रकरण राजकीय दबावातून पुन्हा दडपले गेल्याचे काळे यांनी संशय व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांसह यांच्याकडे तक्रारी

मुख्यमंत्री, नगर विकास, गृह, उच्च व तंत्र शिक्षण खात्यांचे मंत्री, पालकमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, नगर विकास, गृह, उच्च व तंत्र शिक्षण विभागांचे प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण आयुक्त, विभागीय सहसंचालक, नाशिक विभागीय आयुक्त, विभागीय पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त, शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य यांच्याकडे दोषींवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली. त्याची कोणीही दखल घेतली नाही.

शासकीय तंत्रनिकेच्या समितीत धक्कादायक माहिती

किरण काळेंच्या तक्रारीनंतर शासकीय तंत्रनिकेतनने पाच सदस्य समिती गठीत केली. सखोल चौकशी केली. यातून धक्कादायक माहिती उघड झाली. 778 रस्त्यांच्या कामांचे गुणवत्ता अहवाल हे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शासकीय आस्थापनेचे बनावट लेटरहेड, बनावट शिक्के वापरून तयार केल्याचे निष्पन्न झाले. मात्र पुढे मनपा, शासकीय तंत्रनिकेतनने संगनमत करत राजकीय वरदहस्थातून गुन्हा दाखल न करताच घोटाळा दडपल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT