Maratha Vs OBC : मराठा समाजाविरुद्ध लढताना OBC नेते पुन्हा फुटले; बड्या नावाला दाखवला बाहेरचा रस्ता

Maratha Vs OBC : मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीतून ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांमधील अंतर्गत मतभेद प्रकर्षाने दिसून आले.
National OBC Federation president Dr. Babanrao Taywade excluded from CM Devendra Fadnavis meeting on Maratha reservation, exposing divisions among Maharashtra’s OBC leadership.
National OBC Federation president Dr. Babanrao Taywade excluded from CM Devendra Fadnavis meeting on Maratha reservation, exposing divisions among Maharashtra’s OBC leadership.Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Vs OBC : अखेर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजातील नेत्यांमधील दुफळी पुन्हा दिसून आली आहे. 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात सह्याद्री अतिथिगृहावर बैठक होणार आहे.

महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांमध्ये कधीच एकी नसते, प्रत्येकाची तोंड वेगळ्या दिशेला असतात, अशी टीका ओबीसी आंदोलनावर नेहमीच केली जाते. अशात डॉ. बबनराव तायवाडे यांनी हैदराबाद गॅझेट स्वीकारण्याच्या शासन निर्णयाचे उघड समर्थन केले. या जीआरचा ओबीसी आरक्षणावर काहीच परिणाम होणार नाही, अशी भूमिका मांडली. या भूमिकेवर इतर ओबीसी नेत्यांनी टीका केली.

त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीला तायवाडे यांनाही निमंत्रित केले. ही माहिती मिळताच सकल ओबीसी महामोर्चाच्या प्रतिनिधींनी बैठकीला न जाण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या बैठकीबाबत शुक्रवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली तर यातून संभ्रम वाढेल, ओबीसीला न्याय मिळणार नाही, अशी भूमिका महामोर्चाने घेतली.

National OBC Federation president Dr. Babanrao Taywade excluded from CM Devendra Fadnavis meeting on Maratha reservation, exposing divisions among Maharashtra’s OBC leadership.
Manoj Jarange: मुंडे ज्यांच्या प्रचाराला जाणार, त्या उमेदवाराला पाडणार; जरांगेंनी दंड थोपटले

शेवटी रात्री उशिरा ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाकडून डॉ. तायवाडे यांना बैठकीतून वगळण्यात आल्याचा निरोप देण्यात आला. त्यानंतर महामोर्चाच्या प्रतिनिधींनी बैठकीला जाण्याची तयारी दर्शविली. आता या बैठकीला भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह सकल ओबीसी महामोर्चाच्या प्रतिनिधींना निमंत्रण दिले आहे.

National OBC Federation president Dr. Babanrao Taywade excluded from CM Devendra Fadnavis meeting on Maratha reservation, exposing divisions among Maharashtra’s OBC leadership.
Manoj Jarange Patil : 'शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजसह एकेकाकडून पैसे घ्या', शेतकऱ्यांच्या खिशात हात घालणाऱ्या सरकारला जरांगेंनी सुनावलं

10 ला मोर्चा काढणारच :

दरम्यान, ओबीसी बैठकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रण दिले आहे. या बैठकीत 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करावा, हीच प्रमुख मागणी असणार आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तरी १० ऑक्टोबर रोजी नागपुरात ओबीसींचा मोर्चा काढला जाईल, असे काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com