Sushma Andhare releases video bomb in Ahilyanagar elections Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sushma Andhare Allegations: सुषमा अंधारे यांचा 'व्हिडिओ बॉम्ब'; अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची दहशत अन् ठोकशाही!

Sushma Andhare Exposes Video on Sangram Jagtap : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीच्या दहशतीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची दहशतीचा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समोर आणला आहे.

सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओतून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची निवडणुकीतील विरोधी उमेदवारांवर दहशत निर्माण करत असल्याचा दावा केला आहे. सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या 'एक्स'वरील खात्यावर पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, यावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) प्रचाराला सुरुवात झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला युतीमधील दोन्ही पक्षांनी बाजूला सारले आहे. यातच अजित पवार राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपचे तीन उमेदवार जवळपास बिनविरोध झाल्यात जमा आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ पोस्ट करताना, 'आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) सोबत नसताना, संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक आणि बाॅडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराच्या घराबाहेर रिव्हाॅल्वर घेऊन उभे आहेत. हॅशटॅग दहशत अन् ठोकशाही,' असे सुषमा अंधारे यांनी शेवटी म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये काय?

या व्हिडिओमध्ये पोलिस गणवेशातील दोघे कर्मचारी एका टेम्पोजवळ उभे आहेत, त्यातील एकाच्या हातात पिस्तूल आहे. तो घेऊन फिरत आहे. एक जण लाल रंगाच्या खुर्चीवर बसला आहे. एक जण पायऱ्यांवर बसून मोबाईलवर बोलताना दिसत आहे.

आमदारांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष

सुषमा अंधारे यांच्या या व्हिडिओमुळे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील सत्ताधाऱ्याच्या दहशतीचा चेहरा समोर आला आहे. यामुळे निवडणुकीचं वातावरण आणखी तापणार आहे. सुषमा अंधारे यांनी एक्स खात्यावर पोस्ट करताना, थेट आमदार जगताप यांच्या स्वीय सहायकाचे नाव घेतले. यावर आमदार संग्राम जगताप यांच्याकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ते काय प्रतिक्रिया देतात, याकडे अहिल्यानगरमधील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT