

Ahilyanagar Municipal Election : महापालिका प्रचारासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. यासाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं वेळेचं नियोजन असतं. पण हीच वेळ हुकल्यावर काय होतं, याचा अनुभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांना अहिल्यानगरमध्ये आला.
हेलिकाॅप्टरचा पायलट जेवणासाठी गेला असताना, तो वाहतूक कोंडी अडकल्याने रवींद्र चव्हाण यांना पुढे प्रचाराला जाण्यासाठी तब्बल पाऊणतास त्याची वाट पाहात बसावी लागली. हा सर्व प्रसंग अहिल्यानगरमध्ये झाला.
महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) प्रचारासाठी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अहिल्यानगर दौऱ्यावर होते. नियोजित वेळेनुसार ते सकाळी दहा वाजता अहिल्यानगरमध्ये पोहोचले. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थित अहिल्यानगर शहरातून रॅली काढण्यात आली.
महापालिका निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युती आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या रॅलीला शहरात उशिर झाला. त्यामुळे पुढे प्रचार ठिकाणी पोहोचण्यास रवींद्र चव्हाण यांना उशिर होणार होता. त्यामुळे त्यांनी भाषण देखील दोन मिनिटांत उरकले आणि पोलिस मुख्यालयातील हेलिपॅड गाठले.
रवींद्र चव्हाण हेलिपॅडवर आल्यावर तिथं हेलिकाॅप्टरचा, पायलट नव्हता. तो जेवणासाठी गेला होता. रवींद्र चव्हाण यांच्या स्वीय सहायकाने त्याला संपर्क साधून, लवकर येण्याची सूचना केली. त्यानुसार पायलट देखील निघाला होता. परंतु दिल्ली दरवाजा परिसरात प्रचार रॅलीचा शेवट होणार असल्याने परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
या वाहतूक कोंडीमध्ये पायलट यांची गाडी आडकल्याने, त्याला हेलिपॅडवर येण्यास तब्बल पाऊणतास उशिर झाला. परिणामी, हेलिपॅडवर येऊन थांबलेले रवींद्र चव्हाण यांना देखील बसून राहावे लागले. रवींद्र चव्हाण हे पायलटची वाट पाहात तब्बल पाऊणतास वाहनात बसून होते. यावेळी त्यांच्याबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. भाजपचे पदाधिकारी देखील होते. पाऊणतासाने पायलट आल्यानंतर रवींद्र चव्हाण पुढील प्रचारासाठी हेलिकाॅप्टरने उड्डाण केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.