BJP victory Ahilyanagar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP victory Ahilyanagar : माजी महापौरानं चांगलंच मनावर घेतलं; राजकीय वारसा नसलेल्या ‘पीए’च्या आईला भाजपकडून नगरसेवक केलं

Ahilyanagar Municipal Election: Babasaheb Wakle Backs Sunita Kulkarni as BJP Candidate : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी 'पीए'च्या आई सुनीता कुलकर्णी यांना भाजपकडून उमेदवारी देत इतिहास घडवला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar municipal election : अहिल्यानगर महापालिकेत नवख्या 32 उमेदवारांना महापालिकेच्या सभागृहात बसण्याची संधी मिळाली आहे. यात बहुतांशी माजी नगरसेवकांच्या पत्नी, नातेवाईक अन् अगदी नवख्याचा समावेश आहे. यातच सर्वात लक्षवेधी अन् चर्चेत आहेत त्या सुनीता कुलकर्णी!

कोणताही राजकीय वारसा नसलेल्या सुनीता कुलकर्णी या अहिल्यानगर महापालिकेच्या सभागृहात बसून शहराच्या नियोजनात सहभागी होणार आहे. हा विजय कसा जमला, याची चर्चा शहरात सुरू आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे पीए पुष्कर कुलकर्णी यांच्या सुनीता या मातुश्री आहेत. कोणताही राजकीय वारसा नसताना त्या अहिल्यानगर महापालिकेत निवडून आल्या आहेत.

उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना अनेक वर्षे नेत्यांचे उंबरे झिजवावे लागतात. तरी त्यांना संधी मिळेल की, नाही याची शाश्‍वती नसते. मात्र, भाजपचे (BJP) माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी चक्क ‘पीए’ पुष्कर कुलकर्णी यांच्या आईला सुनीता कुलकर्णी भाजपचे तिकिट दिले नि, निवडूनही आणले. आता, निकालानंतर या तिकिटाची आणि विजयाचीच चर्चा होत आहे.

महापालिका निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी-भाजप युतीने मोठे यश मिळवत सत्ता मिळवली. बाबासाहेब वाकळे यांनी भाजपकडून महापौरपद भूषविले आहे. त्यांचे स्वीय सहायक म्हणून पुष्कर कुलकर्णी काम पाहत होते. त्यांची मतदारांशी चांगलीच नाळ जुळली होती. वाकळे, तसेच पक्षाचा त्यांनी विश्‍वास संपादन केला. त्यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेत वाकळे यांनी त्यांचे नाव लावून धरत ताकद लावली. एका ‘पीए’च्या घरात उमेदवारी देणे म्हणजे आश्‍चर्याची गोष्ट मानली जात आहे.

पुष्कर यांना कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे, सरकारच्या सर्व योजना प्रामाणिकपणे राबवल्या. त्यातूनच त्यांचा संपर्क वाढला. याच कामामुळे सुनीता कुलकर्णी यांना विजय मिळाला. त्यांचा विजय सर्वांत वेगळा मानला जातो. सुनीला कुलकर्णी यांची लढत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शांता शिंदे, शोभा भिंगारदिवे, माजी नगरसेविका वीणा बोज्जा (अपक्ष), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या रूपाली आपरे यांच्याशी होती. यात सुनीता कुलकर्णी या 1 हजार 351 मतांनी विजयी झाल्या.

कुलकर्णींचा आनंद गगनात मावेना...

आईच्या या विजयानंतर पुष्कर कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने न्याय दिला. माझ्यासाठी बाबासाहेब वाकळे यांनी ताकद पणाला लावली होती. त्यांच्याकडे मी बारा वर्षांपासून काम करतोय. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. ते माझ्यासाठी गुरूच आहेत. आजही त्यांचा ‘पीए’ आहे. पक्षाने विश्‍वास ठेवला हेही महत्त्वाचे आहे, असे सांगितले.

वाकळेंचा भाजपमध्ये दबदबा वाढणार?

भाजपचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पीए पुष्कर यांच्या मातुश्री सुनीता यांना निवडून आणण्याची किमया करताना, स्वतः देखील अंगावर विजयाची गुलाल घेतला आहे. भाजपचे निष्ठावान आहे. पीएच्या आईच्या विजयाने आणि स्वतःच्या विजयाने बाबासाहेब वाकळे यांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, भाजपच्या वरिष्ठांमध्ये दबदबा वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT