Mumbai Municipal Election Results : हार-जीतचा थरार शिगेला! मुंबईत माजी महापौर–उपमहापौरांचा गुलाल, राजकीय शक्तिप्रदर्शन

Mumbai BMC Election: Shiv Sena UBT & BJP Leaders Win Big : मुंबई महापालिका निवडणुकीत माजी महापौर-उपमहापौरांनी आपापले गड राखण्यात यश मिळवलं आहे.
Mumbai mayor
Mumbai mayorSarkarnama
Published on
Updated on

Mumbai BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत महापौर-उपमहापौर म्हणून काम केलेल्या सात जणांनी आज आपले गड राखले. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर, ॲड. सुहास वाडकर, भाजपच्या अलका केरकर यांचा समावेश आहे.

मुंबई पालिकेच्या मानाच्या पदावर काम केलेल्या या बढ्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते; मात्र त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत आपला अनुभव सार्थ ठरवला.

मुंबई (Mumbai) महापालिकेत 227प्रभाग असून त्यासाठीच्या निवडणूक रिंगणात तब्बल 1700 उमेदवार होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष-मनसे युती, भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना, काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी आणि इतर लहान पक्ष, अपक्ष निवडणूक लढवत असल्याने निकाल काय लागणार, प्रस्थापितांना धक्का बसणार का, याकडे लक्ष लागले होते.

शिवसेनेचे माजी विभागप्रमुख असलेले मिलिंद वैद्य प्रभाग क्रमांक 182मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सेना पक्षाच्या तिकिटावर मैदानात उतरले होते. त्यांनी तब्बल 14 हजार 284 मते घेत भाजपच्या राजन पारकर यांचा पराभव केला आहे. पारकर यांना 4394 मते मिळाली आहेत. ही निवडणूक माजी आमदार सदा सरवणकर आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती.

Mumbai mayor
BJP Mumbai Victory: ठाकरे बंधूंच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण आले समोर; यामुळे गमावली मुंबई

प्रभाग क्रमांक 19मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून माजी महापौर विशाखा राऊत या निवडणूक रिंगणात होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर-गुरव यांचा पराभव करीत पुन्हा पालिकेत एंट्री केली आहे.

Mumbai mayor
Ahilyanagar Ward Wise Winners Result : अहिल्यानगरचा निकाल जाहीर! जनतेने कुणावर विश्वास टाकला? विजयी उमेदवार पाहा एका क्लिकवर

प्रभाग क्रमांक 199मधून शिवसेना ठाकरे सेना पक्षाकडून मैदानात असलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तब्बल 12 हजार 786 मते मिळवत शिवसेना शिंदे गटाच्या रूपाली कुसळे यांना पराभवाची धूळ चारली आहे. कुसळे यांना 11 हजार 97 एवढी मते मिळाली आहेत.

माजी महापौर राहिलेल्या श्रद्धा जाधव या प्रभाग क्रमांक 202मधून शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांनी तब्बल 11 हजार 112 मते घेत भाजपच्या पार्थ बावकर यांचा पराभव केला आहे. बावकर यांना सात हजार 982 मते मिळाली आहेत.

प्रभाग क्रमांक 193मधून शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या तिकिटावर माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना 12 हजार 678 मते मिळाली असून त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रल्हाद वरळीकर यांचा पराभव केला आहे. प्रल्हाद वरळीकर यांना नऊ हजार 837 मते घेतली.

प्रभाग क्रमांक 41मधून माजी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर हे शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. त्यांनी सात हजार 196 मते घेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मानसी पाटील यांचा 596 मतांनी पराभव केला.

माजी उपमहापौर असलेल्या अलका केरकर या भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 98मधून निवडणूक लढत होत्या. त्यांना नऊ हजार 819 मते मिळाली असून मनसेच्या दीप्ती काते यांचा पराभव केला आहे. काते यांना केवळ दोन हजार 533 मते मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com