Eknath Shinde Shiv Sena Defeat : दोस्तीचा आखाडा पेटला! ‘डुप्लिकेट फॉर्म’नं ‘ओरिजनल’ला चीतपट केलं; भाजप बंडखोर लेडीसमोर शिंदेसेना सपाट

Mumbai BMC Election: BJP Rebel Shilpa Keluskar Defeats Eknath Shinde Shiv Sena Pooja Kamble : मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत भाजपचा बंडखोर उमेदवार निवडून जिंकला आहे.
Eknath Shinde Shiv Sena Defeat
Eknath Shinde Shiv Sena DefeatSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीमधील ‘दोस्ती’ अन् ‘कुस्ती’ दोन्ही पाहायला मिळाल्या. भाजपच्या अधिकृत आदेशाला केराची टोपली दाखवत, एबी फॉर्मची ‘कलर झेरॉक्स’ जोडून निवडणूक लढवणाऱ्या शिल्पा केळुसकर यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली.

त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा पराभव केला. मुंबईत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. याचा फटका थेट एकनाथ शिंदे शिवसेनेला बसला.

मुंबईतील ​प्रभाग क्रमांक 173ची जागा महायुतीच्या जागा वाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे रिंगणात होत्या, जागा हातातून गेल्याने संतापलेल्या भाजपच्या (BJP) केळुसकर यांनी माघार न घेता बंडखोरी केली. विशेष म्हणजे, भाजपने त्यांचा एबी फॉर्म परत मागवला असतानाही, केळुसकर यांनी त्या फॉर्मची कलर झेरॉक्स आयोगाला सादर केली आणि अपक्ष नसून ‘भाजप’ म्हणूनच निवडणूक लढवली.

​या लढतीदरम्यान प्रचाराची पातळी चांगलीच खाली घसरली होती. प्रचारादरम्यान केळुसकर समर्थकांनी ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराला सतत डिवचले. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या ‘प्रतिमेवर’ थेट घाला घालण्याचा प्रयत्न झाला. प्रत्युत्तरात एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केळुसकरांना ‘एबी फॉर्म चोर’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली; मात्र मतदारांनी ‘चोर’ म्हणण्यापेक्षा ‘खोक्यां’च्या घोषणेवर अधिक विश्वास दाखवल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे.

Eknath Shinde Shiv Sena Defeat
Mumbai Municipal Election Results : हार-जीतचा थरार शिगेला! मुंबईत माजी महापौर–उपमहापौरांचा गुलाल, राजकीय शक्तिप्रदर्शन

​हा निकाल म्हणजे केवळ एकनाथ शिंदे शिवसेनेचा पराभव नसून भाजपच्या मुंबई नेतृत्वाचीही नाचक्की मानली जात आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहून केळुसकर यांचा अर्ज बाद करण्याची विनंती केली होती; मात्र तांत्रिक मुद्द्यांवर आयोगाने तो अर्ज वैध ठरवला. आता ‘डुप्लिकेट’ फॉर्म लावून ‘ओरिजनल’ उमेदवाराला पाडणाऱ्या केळुसकर या भाजपमध्ये परतणार की, अपक्ष राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde Shiv Sena Defeat
Satej Patil : एकट्या बंटी पाटलांनी महायुतीला आणले घायकुतीला, सत्ता युतीची पण काँग्रेस ठरला मोठा पक्ष

​हा पराभव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ज्या मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिंदे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे, तिथे त्यांच्याच मित्रपक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांना उघड आव्हान देऊन पराभूत केल्याने महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com