MLA Vikram Pachpute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar municipal election : मित्रपक्षांचं काही होऊ दे! इच्छुकांची गर्दी पाहून भाजप खुश! महापालिकेसाठी स्वबळाची तयारी

Ahilyanagar Municipal Election BJP Interviews 350 Aspirants Says MLA Vikram Pachpute : अहिल्यानगर महापालिका निवडणूक लढण्याची भाजपकडून तयारी पूर्ण झाल्याची माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली.

Pradeep Pendhare

BJP municipal election preparation : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीला समोरे जाण्यासाठी भाजपची संपूर्ण तयारी झाली आहे. आज इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्त केलेले आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी या मुलाखती घेतल्या.

अहिल्यानगर महापालिकेच्या 17 प्रभागांसाठी 310 जणांनी दिलेल्या मुलाखती पाहून भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी खुश झाले आहेत. यातून स्वबळाची चर्चा घुमू लागली आहे. मित्र पक्षांचं काय राजकीय गणितं असतील, ते असू देत, पण निवडणुकांना स्वबळाने समोरे गेले पाहिजे, अशी ही चर्चा आहे. "भाजपकडून सूक्ष्म सर्व्हे सुरू असून, 17 प्रभागांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. महायुती झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची तयारी आहे," असे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी म्हटले.

अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या (BJP) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना आज पार पडल्या. आमदार विक्रमसिंह पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर व समन्वयक विनायक देशमुख यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, "अहिल्यानगर महापालिकेसाठीही पक्षाची वेगळी रणनीती असणार आहे. पक्ष प्रत्येक प्रभागाचा सूक्ष्म सर्व्हे करत आहे. या सर्व्हेनंतरच उमेदवार निश्चितीचा निर्णय प्रदेश पातळीवरून घेतला जाईल. निवडणुकीसाठी महायुतीचा (Mahayuti) निर्णयही प्रदेश पातळीवर होईल. तरीही निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याची पक्षाची तयारी आहे. निवडणुकीसाठी पक्षाची प्रत्येक प्रभागात 100 टक्के तयारी झाली आहे. जर महायुती झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे."

सर्व्हेला हलक्यात घेऊ नका

'भाजपच्या सर्व्हेमध्ये बारीकसारीक गोष्टींचा विचार केला जात आहे. सर्व्हेत ज्याचे नाव आघाडीवर, असेल अशा उमेदवारांचा विचार केला जाईल. ज्याच्याकडे अपुरी यंत्रणा आहे, पण निवडून देण्याची क्षमता आहे, अशा सामान्य कार्यकर्त्यालाही पक्ष तिकीट देणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात केलेल्या कामांचा लोखाजोखा द्यावा. तसेच जास्तीत जास्त संपर्क ठेवून प्रभागातील प्रभुत्वावर भर द्यावा,' अशा सूचना आमदार पाचपुते यांनी केल्या.

वशिलाने उमेदवारी मिळणार नाही

शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी, महापालिकेच्या निवडणुकीची पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील महापालिकेच्या 17 प्रभागांसाठी तब्बल 310 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीत कोणालाही वशिल्याने उमेदवारी मिळणार नाही. महापालिकेवर भाजपचा झेंडा किंवा महायुतीचा झेंडा फडकेल, या दृष्टीने कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने निवडून लढवावी, असे सांगितले.

स्वबळाचा नारा, मित्रपक्षाचा विचार नंतर...

दरम्यान, भाजपने घेतलेल्या मुलाखतीत अहिल्यानगरमधील 17 प्रभागांमधील उमेदवार आल्याने, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक नेते खुश झाले आहेत. यातून स्वबळाची तयारीला संधी आहे, अशी चर्चा रंगली आहे. मित्रपक्षांचा विचार नंतर, पहिले आपले कार्यकर्ते, असा सूर मुलाखत स्थळी रंगला होता. यातच आमदार पाचपुते यांनी महायुतीचा निर्णय प्रदेश पातळीवर होईल, असे सांगताना वेळ आल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना बळ दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT