Satyajeet Tambe Angry controversy : विखेंच्या नातवा जवळून गेलेला बिबट्या, तांबेंनी सांगितली घटना; मोर्चासमोर न येणाऱ्या प्रांताधिकाऱ्यावरून उपअधीक्षकांना झाप-झाप झापलं!

Leopard-Free Sangamner Demand Jayashree Thorat Janakrosh Morcha, Satyajeet Tambe Slams Officials : संगमनेर बिबट्या मुक्त व्हावे अन् सिद्धेश कडलग या मुलाच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून न्याय मिळावा यासाठी जयश्री थोरात यांनी जनआक्रोश मोर्चा काढला होता.
Satyajeet Tambe Angry controversy
Satyajeet Tambe Angry controversySarkarnama
Published on
Updated on

Leopard free Sangamner protest : बिबट्या मुक्त संगमनेरसाठी युवक काँग्रेसच्या जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या सिद्धेश कडलग याच्या कुटुंबियासह संगमनेरमधील शेतकरी, स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे देखील आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, निवेदन घेण्यासाठी प्रांताधिकारी आंदोलकांसमोर न येण्यावरून आमदार तांबे चांगलेच संतापले होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिस उपअधीक्षकांना यावरून त्यांनी चांगलेच झापले. कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, याला जबाबदार सरकारी अधिकारी राहतील, असा इशारा आमदार तांबेंनी दिल्यावर प्रांताधिकाऱ्यांनी समोर येत निवेदन स्वीकारलं. दरम्यान, बिबट्या गरिब-श्रीमंत असं बघत नाही, असे सांगून मंत्री विखे पाटील यांच्या नातवा जवळून गेलेल्या बिबट्याचा किस्सा यावेळी आमदार तांबेंनी सांगितला.

युवक काँग्रेसच्या (Congress) जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली बिबट्यामुक्त संगमनेरसाठी आणि मयत सिद्धेश कडलग याच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी समोर येत नसल्यावरून आमदार सत्यजीत तांबे चांगलेच संतापले होते. यावेळी त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस उपअधीक्षकांनी चांगलेच झापले.

सत्यजीत तांबे यांनी सिद्धेश कडलग याला घराच्या दरवाजापासून बिबट्यानं उचलून नेलं. हा प्रसंग कोणावर येऊ शकतो. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांच्या पत्नी शालिनी या त्यांच्या नातवाला शेतात जेवू घालत होत्या. त्यावेळी अवघ्या पाच फुटावरून बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली. ऑगस्ट 2020 मध्ये घडलेल्या या घटनेची आठवण करून देताना, बिबट्या गरिब-श्रीमंत पाहून येत नाही, तो कोणाकडे येऊ शकतो, असे सांगितले.

Satyajeet Tambe Angry controversy
Marathi Man Prime Minister : 'मराठी माणूस पंतप्रधान होणार'; पृथ्वीबाबांच्या विधानावर वडेट्टीवारांसह ठाकरेंच्या शिलेदाराच्या काॅन्फिडंटने वाढवली 19 डिसेंबरची उत्सुकता!

बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या सिद्धेश कडलग याच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत इथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका सत्यजीत तांबे यांनी घेत, तिथं बंदोबस्तावर असलेल्या पोलिस उपअधीक्षकांना, प्रांताधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी येत नसल्याच्या भूमिकेवरून सुनावलं.

Satyajeet Tambe Angry controversy
AI job cuts Maharashtra : ‘एआय’ अन् जगभरात नोकर कपात, महाराष्ट्रातील स्थितीवर मंत्री सामंतांचं छापील उत्तर; विरोधक म्हणाले 'अभ्यास नसणे...'

प्रशासनाला वाकडंच कळतं

सत्यजीत तांबे यांनी, पोलिस उपअधीक्षकांना, काय झालं आहे की, तुम्हाला गोड ऐकायची सवयच राहिली नाही. प्रशासनाला, पोलिस निरीक्षकांना वाकड्यात बोलण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे तुमच्या साॅफ्टवेअरमध्ये, अशी सिस्टम झाली आहे की, तुम्हाला वाकडं बोलल्याशिवाय ऐकतच नाही. आम्ही एवढं प्रेमानं बोलतो की, तुम्हाला कळतच नाही. आमची चूक आहे, बाळासाहेब थोरातांचे संस्कार आहेत की, तालुक्यातील अधिकाऱ्यांशी चांगलं बोला, चांगलं वागा. ही आमची चूक वाटते, तु्म्ही हातावर हात धरून उभे आहेत केव्हाचे, असे सुनावलं.

...अन् तांबेंकडून विषय कट!

यानंतर लांब उभे असलेले पोलिस उपअधीक्षक हे आमदार तांबे यांच्याजवळ मोर्चात आले. पोलिस उपअधीक्षकांनी वन विभागाचे अधिकारी आले आहेत, असे सांगितले. पण त्यावर सत्यजीत तांबे यांनी इथं सरकारचा प्रतिनिधी कोण आहे? त्यांनी खाली यावं, विषय कट, अशा शब्दात सुनावलं.

तुम्हाला मुलं नाही का?

'हे काही राजकीय पक्षाचं आंदोलन नाही. इथं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सिद्धेशाच्या वडिलांविषयी सहानुभूती ठेवा. आपल्याला नाही का मुलं? कायदा-सु्व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची देखील आहे. हे सगळे आत घुसले, तर मग काय कराल. मी सगळ्यांना आत जायला सांगेल, मग सांभाळण्याची जबाबदारी तुमची. यावर पोलिस उपअधीक्षकांनी निवडणुकांची वेळ आहे, आचारसंहिता सुरू आहे, असे आमदार तांबेंना सांगण्याचा प्रयत्न केला.

आमदार तांबेंचा इशारा अन्...

आमदार तांबे यांनी, यावर इलेक्शनचा काहीच संबंध नाही. प्रांताधिकारी यांनी तसं लेखी द्यावं. मी विषय सोडून देईल. यावरही उपअधीक्षकांनी आमदार तांबेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तांबेंनी ऐकलं नाही. प्रांताधिकारी हा सरकारचा प्रतिनिधी आहे. त्यानं इथं आंदोलकांसमोर यावं, हे त्याचं कर्तव्य आहे. जर यानंतर आंदोलकांमुळे कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, सर्व जबाबदारी पोलिस प्रशासनाची असेल. इथं अशी परिस्थिती निर्माण होईल की, जिल्हाधिकारी इथं येतील, असा इशारा दिला. यानंतर प्रांताधिकारी मोर्चाच्या समोर येत, मागण्याचं निवेदन स्वीकारलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com