Ahilyanagar municipal election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar municipal election : पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक, तोडगा नाहीच; शिंदेंची शिवसेना अहिल्यानगरमध्ये वेगळ्याच मूडमध्ये!

Ahilyanagar Municipal Election: Sangram Jagtap Claim on Eknath Shinde Shiv Sena Seats Puts Mahayuti in Trouble : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जागेवर अजित पवार राष्ट्रवादी दावा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Pradeep Pendhare

Mahayuti alliance : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महायुती फिस्कटल्याचं चित्र आहे. पहाटे चार वाजेपर्यंत जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्यात ही बैठक झाली.

पण तोडगा निघाला नसल्याने, शिवसेनेने आज दुपारानंतर निर्णय जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, तिथं काय निर्णय होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे. यावर देखील दुपारनंतर तोडगा निघेल, असे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना पक्षाच्या काही जागांवर दावा केला आहे. यातून शिवसेनेच्या वाट्याला 18 ते 19 जागा राहतात. पण शिवसेनेच्या पूर्वी 23 जागा आहेत. त्यात एक जागा वाढून 24 जागांवर शिवसेनेचा दावा आहे. परंतु आमदार संग्राम जगताप यांनी 32 जागांवर दावा केला आहे. भाजप देखील 30 जागांवर दावा करत आहे. यातून महायुतीत धुसफूस सुरू आहे.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आमदार जगताप काही जागांवर ठाम आहेत. तिथं ते तडजोड करण्याच्या तयारीत नाही, असे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत अर्ज भरण्याची वेगानं प्रक्रिया पार पाडण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेने दुपारी पत्रकार परिषद घेण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीसंदर्भात सर्व अधिकारी स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यामुळे दुपारी होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसंच यातच ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष ठेवून आहे. कोतकर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. कोतकरांनी धनुष्यबाण हातात घेतल्यास, स्थानिक शिवसेनेला अधिक बळ मिळेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे कोतकरांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लोकसभा अन् विधानसभेतील भूमिकेमुळे अडचण

दुसरीकडे महायुतीमधील भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होताना दिसत आहे. या दोन्ही पक्षाचे सूर जुळले आहे. लोकसभा अन् विधानसभेला एकनाथ शिंदे शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेवकांची, पदाधिकाऱ्यांची भूमिका वेगळी राहिलेला आहे. त्याचा परिणाम महायुतीवर होत आहेत. महायुतीत भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील अन् आमदार संग्राम जगताप यांच्या एक सूर आहे.

मंत्री विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया

महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असताना, मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. किती जागा मागायच्या हा शिवसेनेचा अधिकार आहे. परंतु त्यांनी महायुतीत यावे, अशी आमची अपेक्षा आहे. चर्चे अंती निर्णय होईल, काहीतरी चांगले होईल. निवडणूक प्रक्रियेत नव्या जुन्यांचा मेळ घालावाच लागतो, त्यात कुणाला जाणीवपूर्वक उमेदवारीपासून डावलायचे, अशी आमची भूमिका नाही. यादी जाहीर होईल तेव्हा कळेल की किती निष्ठावंतांना उमेदवारी दिलेली आहे. महायुती होईल, यासाठी मी आशावादी आहे. त्यावर सोमवारी निर्णय होईल, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT