Nilesh Lanke leadership MVA Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke leadership MVA : नीलेश लंकेंचा करिष्मा चालेना? 'मविआ'चे सूत्र जमेना! ठाकरे अन् पवारांचे शिलेदार महायुतीसह 'आपापसात' भिडणार

Ahilyanagar Municipal Election: MVA Parties to Contest Against Mahayuti in Eight Wards : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत 'मविआ'मधील ठाकरे अन् पवार यांचे शिलेदार महायुतीसह आपापसात लढणार असल्याचं चित्र आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar municipal election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा प्रचाराला सुरूवात झाली आहे. महायुतीमधील भाजप अन् अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे, तर महायुतीमधून बाजूला सारलेला एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रभागात प्रचाराचा 'श्रीफळ' फोडला आहे.

महायुतीचे गणित बिघडलेले असतानाच, महाविकास आघाडीचे देखील याहून अधिक गणित बिघडल्याचे दिसते. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आठ प्रभागांत महायुतीसह समोरासमोर भिडणार आहे. यामुळे 'मविआ'चे टेन्शन वाढले असून, 'मविआ'चे नेतृत्व करणारे खासदार नीलेश लंके यांचा करिष्मा चालेनाशी झाल्याची कुजबूज स्थानिक नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. महाविकास आघाडीतील (MVA) अंतर्गत समीकरणे शहराच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. लोकसभेला शहरातील मतदारांनी मविआच्या बाजूने कौल दिला होता. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे टेन्शन वाढवले होते.

आता महापालिकेत एकूण 17 प्रभागांतील 68 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र या उमेदवारीमुळे आघाडीतीलच प्रमुख पक्षांमध्ये 17 पैकी तब्बल 8 प्रभागांत ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार आहे.

'मविआ'मध्ये एकप्रकारे फूट पडल्याने, परिणामी हे प्रभाग सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 2, 6, 9, 11, 13, 15 आणि 16 मध्ये आघाडीतील दोन पॅनल समोरासमोर उभे ठाकल्याने मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. यामुळे आघाडीत जवळपास बिघाडी निश्चित मानली जात आहे.

डावलणे अवघड जात आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले, "लोकसभा अन् विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांना डावलणे योग्य ठरणार नाही. या भूमिकेतूनच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय होत आहे." तथापि, खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली काही प्रभागांमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही कळमकर यांनी म्हटले.

कुजबूज वाढली

शरद पवार एनसीपीचे अभिषेक कळमकर यांची लढतीबाबत भूमिका समोर आली असताना, शिवसेना ठाकरे सेना पक्ष अन् काँग्रेस पक्षाची अजून तरी भूमिका समोर आलेली नाही. पण शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. विधानसभा निवडणुकीवेळी राज्य पातळीवर जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत राहिला, तिच परिस्थिती 'मविआ'बाबत अहिल्यानगर महापालिका निवडणुकीबाबत होत आहे. यावर तोडगा काढण्यात खासदार नीलेश लंके यांचा करिष्मा कमी पडतो की काय? अशी कुजबूज सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT