Balasaheb Borate and Deep Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar municipal election : बोराटे, चव्हाण, त्र्यंबके, गायकवाड, येवलेंना 'दे धक्का'; दिग्गजांची अडचण तर, नवख्यांचा मार्ग मोकळा

Ahilyanagar Municipal Election Female Reservation in Wards of Balasaheb Borate and Deep Chavan : अहिल्यानगर महापालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीच्या पाच, ओबीसीच्या नऊ आणि सर्वसाधारणच्या 20, अशा एकूण 34 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar ward-wise lottery : अहिल्यानगर महापालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीत माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दीप चव्हाण, सुनील त्र्यंबके, प्रशांत गायकवाड, अमोल येवले यांना अडचणीची ठरली. दिग्गजांची अडचण झाली तर, नवख्यांचा मार्ग मोकळा झाला. अनुसूचित जातीच्या पाच, ओबीसीच्या नऊ आणि सर्वसाधारणच्या 20, अशा एकूण 34 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.

आरक्षण सोडतीनंतर निकाल मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. आयोगाच्या निर्देशानुसार व लोकसंख्येनुसार अनुसूचित जमातीसाठी एक जागा प्रभाग सात मध्ये थेट आरक्षणाद्वारे निश्चित करण्यात आली. तसेच, लोकसंख्येच्या निकषानुसार अनुसूचित जातीच्या नऊ जागा आरक्षणाद्वारे निश्चित करण्यात आल्या. त्यापैकी पाच महिलांच्या जागा चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आल्या.

नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 18 पैकी 17 जागा आरक्षणाद्वारे (Reservation) प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे निश्चित करण्यात आल्या. एक जागा चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आली. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव असलेल्या नऊ पैकी सहा जागा आरक्षणाद्वारे निश्चित झाल्या. उर्वरित तीन जागा सोडत काढून निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या एकूण जागांपैकी सर्वसाधारण प्रवर्गाच्या 40 जागा असून, यापैकी 20 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अंतिम आरक्षण

आरक्षण सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. प्रारुप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांवर विचार करुन 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान निर्णय घेऊन अंतिम आरक्षण 2 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या भिडूची पुन्हा कोंडी

माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांची प्रभाग दोन मध्ये अडचण झाली. या ठिकाणी अनुसूचित जाती महिलेचे आरक्षण निघाले आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांची तसेच प्रभाग पाचमध्ये पुन्हा एकदा अडचण झाली. त्यांच्या प्रभागात अनुसूचित जातीची जागा महिलेसाठी आरक्षित झाली आहे.

शेंडगे, डागवालेंचा मार्ग मोकळा

माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांच्या प्रभाग नऊ मधील अनुसूचित जातीची जागा पुरुषासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर प्रभाग 11 मध्ये ओबीसी प्रवर्गाची जागा पुरुषासाठी सुटल्याने माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनाही मैदान मोकळे झाले आहे.

बोराटेंच्या अडचणीत वाढ

माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचा हक्काचा प्रभाग 12ची तोडफोड झाली आहे. या प्रभागाचा काही भाग थेट सारसनगरला जोडला गेला. बोराटे यांच्या या अडचणीत आरक्षणामुळे आणखी भर पडली. प्रभाग 12 मधील ओबीसीची जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे.

सौभाग्यवती उतरणार मैदानात

अंतिम प्रभाग रचनेत काही प्रभागांची मोडतोड झाली. त्यामुळे अनेक इच्छुकांची कोंडी झाली. आता आरक्षणामुळे देखील काहींची अडचण झाली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती जागांच्या महिला आरक्षणामुळे काहींना आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. प्रभाग पाच, दोन, 12, 16, अशा काही प्रभागांमध्ये राखीव जागांमुळे पुरूषांची अडचण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT