Nagar Urban Bank scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Urban Bank scam : नगर अर्बनभोवती आता 'ईडी'चा फेरा; राजेंद्र गांधींकडील पुराव्यांची शहानिशा करणार

ED Mumbai to Examine Evidence from Rajendra Gandhi in Nagar Urban Bank Loan Scam : नगर बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांनी 16 जुलैला पुरावे घेऊन मुंबई 'ईडी' कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

Pradeep Pendhare

Urban bank loan fraud Maharashtra : नगर अर्बन सहकारी बहुराज्यीय बँकेच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता सक्तवसुली संचालनालय (ED) नगरच्या मैदानात उतरली आहे.

पोलिस, न्यायालयाच्या फेऱ्यात अडकलेली बँक आता 'ईडी'च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याचे दिसते आहे. बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांनी 16 जुलैला पुरावे घेऊन मुंबई 'ईडी' कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

अर्बन बँकेच्या कर्जवितरणात 291 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बँक (Bank) बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांनी करत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांनी ही तक्रार दिली होती. पोलिसांनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कर्जदार, अशा 105 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेने हा तपास केला. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास गांभीर्यानं केला नसल्याचा आरोप आहे.

नगर अर्बन बँकेत, या कर्जवितरण घोटाळ्याबरोबर 3 कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळा, 22 कोटी रुपयांचा पिंपरी-चिंचवड शाखेतील घोटाळा, शेवगाव शाखेतील 5 कोटी 30 लाख रुपयांचा सोनेतारण घोटाळा, असे चार गुन्हे दाखल झालेले आहेत. या घोटाळ्यांच्या मालिकेनं बँकेच्या कारभाराला सुरूंगचा लागला.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), केंद्रीय सहकार मंत्रालयाने बँकेचे अधिकार गोठावले. तरीही संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीत बदल झाला नाही. यानंतर बँकेचा 4 नोव्हेंबर 2023 मध्ये परवाना रद्द झाला. बँकेवर अवसायक म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयातील गणेश गायकवाड यांची नियुक्ती झाली. 'डीआयजीसी'च्या माध्यमातून बँकेने ठेवीदारांना ठेवी परत करण्यास सुरवात केली. कर्ज वसुली न झाल्याने बँकेची रक्कम 700 कोटी रुपयांवर पोचली.

यातच बँकेतील घोटाळ्यांची मालिका, व्याप्ती अन् बँकेचा बहुराज्यीय दर्जा असल्याने 'ईडी'मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. बँक अवसायनात जाण्यापूर्वी ती सत्ताधारी भाजपकडे होती. दिवगंत माजी खासदार दिलीप गांधी यांचे बँकेवर वर्चस्व होते. आता याच बँकेची ईडीमार्फत चौकशी होणार आहे.

बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी 'ईडी'च्या मुंबई कार्यालयात आठ जुलैला हजर होते. आता बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांना 16 जुलैला पुरावे घेऊन सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात उपस्थित राहण्याचा सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT