
Sharad Pawar VS BJP : भाजप हा पक्ष नेहमीच भविष्याचा विचार करून चाली खेळत असतो, हे अनेकदा सिद्ध देखील झाले आहे. बारामती लोकसभा जिंकणे हे भाजपचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते एकदा जाहीर बोलून देखील दाखवले आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीला अजून चार वर्षांचा कालावधी आहे. मात्र, शरद पवारांना बारामतीत घेरण्यासाठी भाजप आत्तापासूनच तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा आता राज्यभरात सुरु झाल्या आहेत.
भाजपने काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात 'ऑपरेशन लोटस' राबवायला सुरुवात केली आहे. भोर, इंदापूर नंतर आता पुरंदर मध्ये देखील भाजपाने आपले फासे टाकले आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपने काँग्रेसमध्ये आपली हयात घालवलेले माजी आमदार संग्राम थोपटे कुटुंब गळाला लावत भोर, राजगड, मुळशी विधानसभा मतदारसंघ आपली ताकद वाढवली. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भोर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. याच विधानसभा मतदारसंघात त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मोठं लीड मिळालं होतं.
2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अनपेक्षितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राष्ट्रवादीत आलेल्या शंकर मांडेकर यांना तिकीट देत मोठा विजय मिळवला होता. मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा तब्बल 20 हजार मतांनी पराभव केला होता. ते संग्राम थोपटे आता भाजप सोबत आल्याने भाजपची ताकद या मतदारसंघात वाढली आहे.
भोरसोबतच बारामती लोकसभा मतदारसंघात आणखी एक महत्त्वाचा असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजेच इंदापूर विधानसभा मतदारसंघ यामध्ये अजित पवार यांचे आमदार दत्तात्रय भरणे हे आहेत. इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकी पूर्वी भाजपकडे हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने एक तगड नेतृत्व होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे इंदापूरमध्ये भाजप कमकुवत झाली होती.
अशामध्ये भाजप गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूरमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी एका बड्या नेत्याच्या शोधात होती. अशातच अपक्ष विधानसभा निवडणूक लढवलेलआणि सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने यांना पक्षात प्रवेश देत इंदापूर मध्ये सुद्धा भाजपने आपली ताकद वाढवली आहे. प्रवीण माने यांच्या पक्ष प्रवाशाने अजित पवारांचे आमदार असलेले दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
इंदापूर आणि भोरमध्ये दोन बडे नेते पक्षात घेतल्या नंतर भाजपने आपला मोर्चा हा पुरंदर विधानसभा मतदारसंघाकडे आता वळलेला आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते संजय जगताप हे येत्या 16 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे हे आमदार आहेत तसेच अजित पवार यांची देखील मोठी ताकद या मतदारसंघात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँगेस आणि शिवसेना शिंदे गटांची ताकद असणाऱ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात आता भाजपने माजी आमदारालाचं पक्षात घेत इथे सुद्धा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांतील खडकवासला आणि दौंड विधानसभा मतदारसंघात आधीच भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे उरलेल्या चार विधानसभा मतदारसंघांपैकी बारामती वगळता इतर तीन विधानसभा मतदारसंघात आता भाजपने त्या-त्या विधानसभा मतदारसंघात मोठं प्रस्थ असणारे नेते पक्षात घेत थेट बारामती लोकसभा मतदार संघावरच वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत.
अजित पवार हे महायुतीत उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचाच घटक आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार की स्वतंत्र हे अजून स्पष्ट नाही. मात्र, भाजपच्या अलीकडील हालचालींमुळे बारामती लोकसभा मतदारसंघात ‘ऑपरेशन लोटस’ पूर्णपणे सक्रिय झाल्याचं चित्र समोर येत आहे. स्थानिक पातळीवर विरोधी पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांना आपल्या गोटात खेचून भाजपने बारामतीत संघटनात्मक पातळीवर बळकटी साधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप स्वबळावर करत आहे का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.